अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय:पक्षातील नेत्यावरच अजित पवार संतापले
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक नेते महाराष्ट्राचा दौरा देखील करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर सध्या जनसन्मान यात्रा काढली आहे. सध्या त्यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू आहे. मात्र मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच अजित पवार गटातील नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली. यावर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुले उमेश पाटील यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावर अजित पवार म्हणाले, कुत्रे गाडी खाली जाते, तसे त्याला वाटते तोच गाडी चालते. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. परंतु अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असे म्हणत त्यांनी उमेश पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौऱ्यावर आले म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होता, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार पुढे म्हणाले, मोहोळकरांना आगामी काळात देखील निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द देतो. मोहोळ आणि बारामती फार दूर नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर या भागातील लोकांसाठी विकास कसा करता येईल, त्यासाठी करावे. काही जण टीका करतात मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र आपण लोकांना फसवायचे नाही, लुबाडणूक करायची नाही, असे अजित पवारांनी सांगितले आहे. नीतेश राणे यांच्या विधानवार अजित पवार म्हणाले, आजसुद्धा मी शिवसेना आणि भाजपसोबत आहे. पण असे असले तरी देखील मी सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसोबत आहे. महाराष्ट्रात काही लोक मुद्दाम जातोय द्वेष पसरवत असल्याचे देखील यावेळी अजित पवारांनी म्हणले आहे.