मुकेश अंबानी आणि नातू पृथ्वी

मुकेश अंबानी आणि नातू पृथ्वी

बरेचदा मुकेश अंबानी आपला नातू पृथ्वी याच्यासह दिसून येतात. NMACC सोहळ्यापासून अनेकदा हे दृष्य पाहायला मिळालं. मुकेश अंबानी बऱ्याचदा आपला नातू पृथ्वी याच्यासह दिसून येतात. आजोबा आणि नातू यांचं नातच वेगळं असतं.

कडेवर पृथ्वीला घेऊन देवाचे दर्शन

कडेवर पृथ्वीला घेऊन देवाचे दर्शन

मुकेश अंबानी बरेचदा सिद्धीविनायकच्या दर्शनाला येतात आणि त्यांच्यासह त्यांचा नातूही असतो. पृथ्वीला त्यांच्या कडेवर घेऊन मंदिरातून बाहेर येताना सध्या फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानी यांचा साधेपणा चाहत्यांना खूपच भावला आहे.

(वाचा – ‘व्यवसाय असा शोधावा की आयुष्यभर…’, मिलिंद गवळी मुलीकडून शिकले ही गोष्ट शेअर केली भावूक पोस्ट)

कसे असते आजोबा – नातू यांचे नाते

कसे असते आजोबा - नातू यांचे नाते

लहानपणापासूनच आजोबा आणि नातू असो अथवा आजी – नातू यांचे नाते नेहमीच वेगळे असते. आई-वडिलांपेक्षाही आजी – आजोबा हे मुलांना अधिक प्रिय असतात. कारण आई-वडील शिस्त लावताना लाड मात्र आजी-आजोबा पुरवत असतात. पृथ्वीदेखील आपल्या आजोबांचा खूपच लाडका असल्याचे दिसून येतेय.

(वाचा – ६० व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीने केले लग्न, कशी झाली रूपाली बरूआशी भेट)

नातवासाठी सर्व काही

नातवासाठी सर्व काही

आजोबा आपल्या नातवासाठी सर्व काही करू शकतात आणि पालकांच्या भूमिकेत बाहेर येऊन नातवासाठी काय योग्य अथवा काय अयोग्य हे जपण्याचा आणि त्यांना ते समजून सांगण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन आजोबांचा असतो. बरेचदा नातूही आपल्या आजोबांकडून ज्या गोष्टी पटकन समजून घेतो त्या आई-वडील पटवून सांगू शकत नाहीत.

(वाचा – Natasha Poonawalla आणि अदारची झाली गोव्याची पार्टीत पहिली भेट, अशी झाली लव्ह स्टोरीची सुरुवात)

आजोबा आणि नातू नात्यातील गोडवा

आजोबा आणि नातू नात्यातील गोडवा

आजोबा आणि नातू या नात्यात एक वेगळाच गोडवा आणि खासपणा असतो. हे प्रत्येक माणूस अगदी मोठा झाला असला तरीही फील करू शकतो. घरात आजोबा आणि आजी असतील तर त्यांच्याशी असलेला जिव्हाळा आणि प्रेम हे वेगळेच असते.

मुकेश अंबानी आणि पृथ्वीच्या या फोटोंमधून हे नाते नक्कीच दिसून येते आणि त्यांचे फोटो पाहून आपल्या आजी-आजोबांची आठवण आल्याशिवायही क्षण जात नाही हे नक्की.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *