मुंबई- थोडीथोडकी नव्हे तर १४ वर्षे जी मालिका प्रेक्षकांना गोकुळधाम सोसायटी आणि या सोसायटीतील एकेक नमुन्यांसोबत खिळवून ठेवत आहे त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काही ना काही घडामोडी होत असतात. गेल्या १४ वर्षात मालिकेतील काही कलाकारांचं निधन झालं तर काही कलाकारांनी भूमिकेला रामराम ठोकला, पण नवे कलाकार घेऊन ही मालिका यशस्वीपणे सुरू ठेवण्यात निर्मात्यांनी बाजी मारली आहे.

निळू फुलेंच्या बायोपिकवर काम सुरू, दिग्दर्शक प्रसाद पण हिरो कोण?

लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक प्रेक्षकाच्या आवडीचा विचार करून ही मालिका मनोरंजन करत असते. या मालिकेच्या लोकप्रियतेचा आकडा काही कमीच होत नाही. नुकतीच या मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफ याची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही भूमिका कवी शैलेश लोढा करत होते. सचिन यांच्या एन्ट्रीनंतर मालिकेत एक असा टवीस्ट येणार आहे की गेल्या अनेक एपिसोडपासून प्रेक्षक या गोडबातमीची वाट पाहत होते. ही बातमी आहे पत्रकार पोपटलालविषयी.


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. त्यामुळे कुणी कलाकार या मालिकेपासून वेगळा झाला तर त्याचा धक्का प्रेक्षकांना बसतो. गेल्या काही वर्षापासून दयाबेन हे पात्र मालिकेत दिसत नाही. तर शैलेश लोढा यांनीही मालिका सोडल्यानंतर नवीन तारक मेहता कोण होणार याची चर्चा होती. ही जागा सचिन श्रॉफ यांनी घेतली आहे.

Health Update- राजू श्रीवास्तव यांना मुंबईत आणण्याची तयारी सुरू?

सचिन श्रॉफ तर नवीन तारक बनून मालिकेत आले पण आता खरी मजा येणार आहे ती पोपटलालच्या आयुष्यात येणाऱ्या एका नव्या व्यक्तीमुळे. या मालिकेतील प्रत्येक नवा ट्रॅक मनोरंजनाची पर्वणी असतो. आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असलेला पत्रकार पोपटलाल यांच्या लग्नाचा घाट घातला जाणार आहे.

सचिन श्रॉफची मालिकेत एण्ट्री झाली त्या निमित्ताने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी पोपटलालची भूमिका करणाऱ्या श्याम पाठक यानेच बोलता बोलता हे सत्य सांगितलं. त्यामुळे पुढच्या काही भागांत सौभाग्यवती पोपटलाल ही नवी एण्ट्रीही होणार आहे. पोपटलालचं लग्न हा फक्त पोपटलालचा प्रश्न नाही तर अख्ख्या गोकुळधामचा प्रश्न बनला आहे.

लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या पोपटलालचं लग्नं अनेकदा होता होता राहिलं आहे. त्याचे मजेदार किस्सेही प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिले आहेत. पण आता नव्या तारक मेहताच्या एन्ट्रीनंतर पोपटलालच्या लग्नाचा बार उडणार म्हटल्यावर प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे. पोपटलालची बायको कोण असेल, ही भूमिका कोण करेल याची उत्तरं अर्थातच पोपटलालच्या डोक्यावर अक्षता पडल्यानंतरच मिळणार आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.