अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:पुण्यात शिवसैनिकांकडून पेढे वाटून आनंद साजरा, विरोधकांच्या भूमिकेचा निषेध
बदलापूर लैंगिक शोषणाच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा आनंद येथील शिवसैनिकांनी मंगळवारी पेढे वाटून साजरा केला. यावेळी त्यांनी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करण्यासाठी आंदोलनही केले. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणात शाळेचा शिपाई आरोपी अक्षय शिंदे यास पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केले. पण आता त्याचे राजकारण महाविकास आघाडी मधील नेते करत आहे. शिंदे सरकार महिला सुरक्षा बाबतीत प्राधान्य देत आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या कारवाईमुळे भविष्यात पुन्हा असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्ष गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. विरोधकांनी बिनबुडाचे राजकारण न करता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर झालेली शिक्षा योग्य असल्याची भूमिका घ्यावी. शिंदे सरकारने केलेली कृती योग्य असून त्याबाबत राज्यातील महिलांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. त्याच सोबत बदलापूर मधील चिमुरडीला या माध्यमातून न्याय मिळाला आहे. महाविकास आघाडी मधील वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे सोयीस्कर राजकारण करत असून ते महिला अत्याचारांना पाठीशी घालणारे आहे. यापुढे कोणीही मुलींवर अत्याचार करण्याचा विचार केला तरी त्यांना जरब बसेल, असे ते म्हणाले.