अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांची थातूरमातूर उत्तरे:घटनाक्रम सांगण्यासही नकार, पाच मिनिटात गुंडाळली पत्रकार परिषद

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांची थातूरमातूर उत्तरे:घटनाक्रम सांगण्यासही नकार, पाच मिनिटात गुंडाळली पत्रकार परिषद

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचे एनकाउंटर काल झाले. यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मात्र, असे असताना ठाणे पोलिसांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांनी पूर्ण घटना सांगण्यासही नकार दिला. अवघ्या पाच मिनिटात ही पत्रकार परिषद गुंडाळली. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांच्या वतीने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या घटनेबाबत मुंब्रा पोलिस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. इतकेच नाही तर मयत अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी देखील अकस्मात मृत्यूचे प्रकरण दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलिस करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. एका पोलिस अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगण्याची विनंती पत्रकारांनी पोलिसांना केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. अक्षयने केलेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी लागली असून इतर पोलिस जखमी असल्याची माहिती त्यांनी दिली. या जखमी पोलिसावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणातील अधिक कोणतीही माहिती आपण सध्या देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे चकमकीवर प्रश्नचिन्ह बदलापूरचे अत्याचार प्रकरण समोर आल्यापासूनच या प्रकरणात सरकारवर आरोपींना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला फाशी देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आता अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर वर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी संबंधीत खालील बातमी देखील वाचा… अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप; कुटुंबीयांकडूनही संशय व्यक्त; फॉरेन्सीक टीमकडून तपासणी बदलापूर येथे 12-13 ऑगस्ट रोजी शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तपासासाठी नेत असताना आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून शिपायावर गोळीबार केल्याचे सरकारने म्हटले आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. आता या प्ररकणावर विरोधकांकडून अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…

​बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचे एनकाउंटर काल झाले. यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मात्र, असे असताना ठाणे पोलिसांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांनी पूर्ण घटना सांगण्यासही नकार दिला. अवघ्या पाच मिनिटात ही पत्रकार परिषद गुंडाळली. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांच्या वतीने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या घटनेबाबत मुंब्रा पोलिस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. इतकेच नाही तर मयत अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी देखील अकस्मात मृत्यूचे प्रकरण दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलिस करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. एका पोलिस अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगण्याची विनंती पत्रकारांनी पोलिसांना केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. अक्षयने केलेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यांच्या पायाला गोळी लागली असून इतर पोलिस जखमी असल्याची माहिती त्यांनी दिली. या जखमी पोलिसावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणातील अधिक कोणतीही माहिती आपण सध्या देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे चकमकीवर प्रश्नचिन्ह बदलापूरचे अत्याचार प्रकरण समोर आल्यापासूनच या प्रकरणात सरकारवर आरोपींना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला फाशी देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आता अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर वर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी संबंधीत खालील बातमी देखील वाचा… अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण:विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप; कुटुंबीयांकडूनही संशय व्यक्त; फॉरेन्सीक टीमकडून तपासणी बदलापूर येथे 12-13 ऑगस्ट रोजी शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तपासासाठी नेत असताना आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून शिपायावर गोळीबार केल्याचे सरकारने म्हटले आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. आता या प्ररकणावर विरोधकांकडून अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment