अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार:पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी

अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार:पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर सहा दिवसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारसाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेच्या मृतदेहाची दफनविधी करण्यात आली. अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच पुरावे नष्ट होऊ नये यासाठी अक्षयचा मृतदेह दहन न करता दफन करण्यात यावा, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या वकिलांनी केली. हायकोर्टाने ती मागणी मान्य करत सरकारला अक्षयच्या मृतदेहाच्या दफनसाठी जागा उपलब्ध करण्याचा आदेश दिला होता. मात्र अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला.
स्थानिकांचा विरोध
बदलापूर येथील स्मशानभूमीत स्थानिकांच्या विरोधानंतर अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कळताच येथील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. मुंबईच्या जे.जे रुग्णालयात उपचारानंतर कळवा येथील रुग्णालयात अक्षयचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यामुळे कळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात आला. अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत मृतदेहास दफन करण्याचे ठरले. खोदलेला खड्डा बुजवून टाकला
उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफन करण्यासाठी रविवारी पहाटे पोलिसांनी तिथे खड्डा खोदला होता. मात्र स्थानिकांना याची माहिती कळताच महिलांनी खोदलेला खड्डा बुजवून टाकला. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना धरपकड केली व स्मशानभूमी परिसर मोकळा केला व पुन्हा खड्डा खोदला. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर अक्षय शिंदेचा मृतदेह शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आला. अक्षयचे कुटुंबीय आणि नातेवाईक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर स्मशानभूमीत सुरक्षेसाठी रोषणाई करण्यात आली तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी देखील पोलिसांकडून घेतली जात आहे.

​बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर सहा दिवसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारसाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेच्या मृतदेहाची दफनविधी करण्यात आली. अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच पुरावे नष्ट होऊ नये यासाठी अक्षयचा मृतदेह दहन न करता दफन करण्यात यावा, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या वकिलांनी केली. हायकोर्टाने ती मागणी मान्य करत सरकारला अक्षयच्या मृतदेहाच्या दफनसाठी जागा उपलब्ध करण्याचा आदेश दिला होता. मात्र अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला.
स्थानिकांचा विरोध
बदलापूर येथील स्मशानभूमीत स्थानिकांच्या विरोधानंतर अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कळताच येथील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. मुंबईच्या जे.जे रुग्णालयात उपचारानंतर कळवा येथील रुग्णालयात अक्षयचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यामुळे कळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात आला. अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत मृतदेहास दफन करण्याचे ठरले. खोदलेला खड्डा बुजवून टाकला
उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफन करण्यासाठी रविवारी पहाटे पोलिसांनी तिथे खड्डा खोदला होता. मात्र स्थानिकांना याची माहिती कळताच महिलांनी खोदलेला खड्डा बुजवून टाकला. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना धरपकड केली व स्मशानभूमी परिसर मोकळा केला व पुन्हा खड्डा खोदला. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर अक्षय शिंदेचा मृतदेह शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आला. अक्षयचे कुटुंबीय आणि नातेवाईक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर स्मशानभूमीत सुरक्षेसाठी रोषणाई करण्यात आली तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी देखील पोलिसांकडून घेतली जात आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment