बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गरोदरपणात खूप चर्चेत आह. आलिया संपूर्ण गरोदरपणाच्या काळात खूप काम करत आहे. मीडिया आणि चाहते देखील या सगळ्या गोष्टीचं कौतुक करत आहेत. आता अशी चर्चा आहे की, आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर आलियाकरता बेबी शॉवरची तयारी करत आहे. आलिया भट्ट प्रेग्नेंसीच्या तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये आहे. आणि गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यातच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो.

रिपोर्टनुसार, ऑक्टोबरच्या सुरूवातीला आलियाच्या ओटभरणीचा कार्यक्रम केला जाईल. 2020 मध्ये आलिया वेगन झाली. असं सांगितलं जातं की, आलियाची बेबी शॉवरची थीम देखील वेगन असणार आहे. जर तुम्ही देखील प्रेग्नेंट असाल आणि आलियाप्रमाणे तुम्ही देखील वेगन फॉलो करत असाल तर गर्भावस्थेत या डाएटशी संबंधित सगळ्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​तुम्ही गरोदरपणात वेगन असू शकता का?

गरोदरपणात आईचा गर्भातील बाळासाठी आणि तिच्या आरोग्यासाठी हेल्दी डाएट असणे गरजेचे आहे. गर्भावस्थेकरता वेळेवर संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. कारण शरीराला पोषण आणि पोषकतत्व योग्य प्रमाणात मिळतील.

जर तुम्ही गर्भवती असाल आणि शाकाहारी आहार घेत असाल तर तुम्ही आहारात काही गोष्टी पुरेशा प्रमाणात घ्यायला हव्यात. आहारात योग्य प्रमाणात आर्यन, विटामिन डी, आयोडीन आणि विटामीन बी १२ घेणे आवश्यक आहे. जे प्रामुख्याने मासे आणि मटणमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.

​वेगनकरता न्यूट्रिशियन

वेगन लोकांकरता आर्यन स्त्रोत आवश्यक आहेत. हे तुम्हाला डाळ, हिरव्या पालेभाज्या, ब्रेड, नट्स, फोर्टिफाइड सिरीयल आणि ड्राय फ्रूट्स यामधून मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच प्लांट बेस्ड विटामिन घेण्याकरता सोया ड्रिंक्सची मदत घेतली जातो.

​प्रीक्लेप्सियाचा धोका

गरोदरपणात जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर प्रीक्लेप्सिया होण्याचा धोका अधिक असतो. webmd मध्ये प्रकाशित एका आर्टिकलमध्ये 775 वेगन मातांचे मेडिकल रेकॉर्ड रिव्यू केले आहेत. ज्यामध्ये प्रीनेटल केअर आणि आपल्या डाएटमध्ये सप्लीमेंट घेत आहेत. या अभ्यासात फक्त एका मातेमध्ये प्रीक्लॅप्सिया लक्षणे आठळली.

​या विकारांपासून करतात रक्षण

प्रेग्नेंसीमध्ये हाय नायट्रेट घेतल्यामुळे बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट असण्याचा धोका निर्माण होतो. नायट्रेटचा स्त्रोत हा मटण आणि स्मोक्ड मासे असा आहे. मात्र वेगन डाएट घेतल्यामुळे याचा धोका कमी होतो.

​मातेला खूप सतर्क राहावं लागतं

NCBI च्या म्हणण्यानुसार, प्रेग्नेंसीमध्ये वेजिटेरियन आणि वेगन डाएट न्यूट्रिशिनल एखाद्या चॅलेंज प्रमाणे असते. यामध्ये आवश्यक पोषणतत्वांची संपर्ण माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा गर्भवती स्त्रीला पोषणाची कमतरता जाणवू शकते. विटामीन बी 12, विटामिन डी, कॅल्शियम, जिंक, आर्यन, प्रोटीन, फॅटी ऍसिड आणि आयोडिन सारखे आवश्यक पोषक तत्वांची कमतरता वेजिटेरियन पदार्थांमध्ये आणि वेगन डाएटमध्ये आढळून आले आहे.

काही नुकसान देखील होते

गर्भावस्थेत वेगन डाएट सुरू केल्यावर हेल्दी राहणे आणि आपलं डाएट व्यवस्थित प्लान करण्याची खूप गरज आहे. जस असं केलं नाही तर तुमच्या शरीराला योग्य पोषणतत्व मिळत नाही. वेगन डाएटमध्ये प्रोटीन, विटामीन बी 12, विटामीन जी, कॅल्शियम, डीएचए आणि आर्यनची कमी असते. यामुळे जन्माच्यावेळी बाळाचे वय कमी असते. तसेच जन्म विकार देखील होण्याची जोखमी अधिक असते.

(वाचा – प्रेग्नेंट आलियाला रणबीरकडून खास सपोर्ट आणि काळजी, गरोदरपणात नवऱ्याने करायला पाहिजेत ‘ही’ कामं)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.