[ad_1]

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. केवळ राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. जर राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्याचवेळी देशाच्या सर्वोच्च इमारतीचे आणि संविधानाच्या मंदिराचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं यावरून मनुवादी विचार दिसून येतात. या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी स्त्रियांबद्दल मनुस्मृती द्वेष दिसला आहे. मला हे मान्य नाही मला सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे. पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राज्य सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण खरच द्यायचे असेल तर त्यांनी केंद्र सरकारला विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला १६% आरक्षणासंदर्भातील विधायक आणायला सांगायला हवं. परंतु राज्य सरकारकडून असं न करता केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. राज्य सरकार चालढकलीचे काम करत आहे. यांना कुणालाच आरक्षण द्यायचे नाहीये. मंडळ आयोगाने कुणबी समाजाला आरक्षण दिले होते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीला देशभरात प्रतिसाद, भाजपच्या पायाखालची जमीन सरकली

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारकडून इंडिया शब्द इतिहास जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, चक दे इंडिया चालते पण तुम्हाला इंडिया शब्द चालत नाही. यावरूनच समजते की केंद्र सरकार किती छोट्या मनाचं आहे. इंडिया आघाडीला देशभरात मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे केंद्रातील भाजपच्या नेत्यांची पायाखालची जमीन हलली आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया शब्द हा इतिहास जमा करण्याचं विधायक विशेष अधिवेशनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. पण जर मी भारत नावाने पार्टी बनवली तर काय करणार आहात तुम्ही? भारत हा कधी देश नव्हताच आणि इंडिया हा देशही कधी नव्हताच. जेव्हा बाबासाहेबांनी संविधान दिले तेव्हा हा देश तयार झाला आणि इंडिया नाव देण्यात आले, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पुणे भाजप ‘इलेक्शन मोड’मध्ये, फडणवीसांची भेट, मोर्चेबांधणीला सुरुवात, महत्वाची मागणीही केली
भाजपकडून देशाच्या संविधानाची पायमल्ली

देशातील मोदी सरकार एककलमी कार्यक्रम राबवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय देखील मोदी सरकारने बदलले आहे. दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने अध्यादेश आणून काढून घेतला आहे. भाजपला सोयीचं असेल अशा प्रकारे केंद्रातील सत्तेचा वापर करण्यात येत आहे. भाजपकडून देशाच्या संविधानाची पायमल्ली करण्यात येत आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकार म्हणतंय समिती अभ्यास करेल, जरांगे म्हणतात, आता अभ्यास नको थेट GR काढा, आमच्याकडे या, पुरावे घेऊन जा!
सर्वसमावेशक हिंदू धर्म मान्य पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही

देशाच्या सर्वोच्च इमारतीचे आणि संविधानाच्या मंदिराचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं यावरून मनुवादी विचार दिसून येतात. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या त्या साधूंची नावे काय होती? हे नावे ऐकून प्राचीन युगात गेल्यासारखे वाटले होते. या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी स्त्रियांबद्दल मनुस्मृती द्वेष दिसला आहे. मला हे मान्य नाही, मला सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे. पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड, तुम्ही सत्तेत बसण्यासाठी सही केली होती की नाही? एवढंच सांगा; हसन मुश्रीफांकडून कोंडी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *