कोलंबो : आशिया कप २०२३ वर पावसाचे अस्मानी संकट कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. स्पर्धेचे उर्वरित सर्व सामने कोलंबो येथे होणार आहेत. कोलंबो शहरामध्ये अक्षरशः पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सुपर 4 चे सर्व सामने होणार कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की आता सुपर-4चा एकही सामना झाला नाही तर अंतिम फेरीत कोणता संघ स्थान मिळवणार?

पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे

पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये एक सामना जिंकला आहे. लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता. पाकिस्तानचे दोन गुण आहेत आणि या संघाने आता एकही सामना खेळला नाही तरीही त्यांचे चार गुण असतील. अशा स्थितीत त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल. तर भारत आणि श्रीलंकेचे संघ ३ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. एक सामना गमावल्यामुळे दोन्ही सामने रद्द झाल्यास बांगलादेशचे दोन गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर पडावे लागेल.

भारत आणि श्रीलंकेत तिकीट कोणाला मिळणार?

येथील सर्व सुपर 4 सामने पावसामुळे रद्द झाले, तर भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर 4 मध्ये कोणाला संधी मिळेल? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. पाऊस पडल्यास, दुसरा फायनलिस्ट संघ नाणेफेकीने ठरवला जाईल. म्हणजेच रोहित शर्मा आणि दासून शनाका यांच्यात नाणेफेक होणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल आणि पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर जाईल.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

सामन्याच्या ठिकाणात बदल नाही

श्रीलंकेतील सुपर 4 सामन्यादरम्यान सतत पाऊस पडत होता. तेव्हाही कोलंबोची परिस्थिती अत्यंत बिकट होती. यानंतर सुपर 4 सामना कोलंबोहून अन्य शहरात हलवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पण असे झाले नाही. आधीच ठरलेल्या ठिकाणी सामना पार पाडण्याचा निर्णय एसीसीने घेतला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *