मयत महिलेच्या नातेवाईकांवर दरोड्याचा आरोप:आमदार उदयसिंग राजपुत यांच्या विरोधात आंदोलन
आमदार उदयसिंग राजपुत यांनी त्यांच्या नागद येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजरच्या माध्यमातून एका मयत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांवर दरोड्यासारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला. ते सर्व गुन्हे मागे घेण्याच्या निषेधार्थ कन्नड शहरातील पिशोर नाका येथे बंजारा ब्रिगेडच्या मनिषा राठोड, दशरथ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पितृपक्षातील कडाक्याच्या उन्हात तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन सोमवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले. आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या आमदार पदाचा गैरवापर करून आम्हा गरीबांवर दरोडे सारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून योग्य तो न्याय देण्याची मागणी शेकडो बंजारा समाजासह आंदोलनकर्त्यांनी केली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी नायब तहसीलदार निलेश राठोड, तलाठी दिपक एरंडे यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारले.
काय आहे प्रकरण
नागद येथे पोळ्याच्या सणाचा बाजार करुन दुचाकीवरून आपल्या पतीसोबत घरी जात असताना खराब रस्त्यामुळे निलाबाई गणेश राठोड (३५) या महिलेचा ३० आँगस्ट रोजी मुत्यु झाला होतो. यासंदर्भात मृत्यू झालेल्या महिलेचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पेट्रोलपंपावरील कार्यालयात गेले असता. आमदार राजपुत यांच्या पेट्रोल पंप मॅनेजरच्या माध्यमातून मृत महिलेच्या नातेवाईकांवर ६० ते ८० हजार रुपये चोरल्याचा व दरोडाचे उद्देशाने जमाव आणला, अशी फिर्याद देऊन मयत महिलेच्या नातेवाईकांवर कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.