कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. सध्या नवरात्री उत्सवापूर्वी मंदिराची स्वच्छता सुरु आहे. तसेच, मंदिराच्या गाभाऱ्याची आणि दागिन्यांची स्वच्छताही करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (२१ सप्टेंबरला) दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच, २१ सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन बंद असणार आहे.

दरम्यान, भाविकांसाठी देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिर येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर, रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

हेही वाचा-फक्त १०-१२ बॉल्स खेळविण्यासाठी या खेळाडूला संघात घेऊ नका, गौतम गंभीर स्पष्टच बोलला

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. मंदिर स्वच्छतेसह दर्शन रांग आणि सुरक्षा याचे नियोजन सुरु असून यंदा भक्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पेड ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पासची किंमत दोनशे रुपये ठेवण्यात आली असून नवरात्रौत्सवात ज्या भाविकांना रांगेत वेळ न घालवता लवकर दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी ही पेड ई-पासची सोय करण्यात येणार आहे. मात्र एका बाजूला पेड ई-पासची सुविधा असली तरी दुसऱ्या बाजूला मोफत दर्शन सेवा ही सुरुच राहणार आहे.

यंदा कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त सण साजरे होत आहेत. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने अंदाजे २५ लाखांवर भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दर्शन रांग व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून यंदा पहिल्यांदाच गर्दी लक्षात घेता मोफत दर्शनासोबतच पेड ई-पास ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा-सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट,स्पर्धेदरम्यान धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरवर्षी अनेक भाविक देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हीआयपी दर्शनासाठी गळ घालत असतात. यामध्ये नेत्यांकडून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेली माणसं असतात ते यावेळी संबधिताना फोन जोडून देतात. त्यामुळे समितीला नकारही देता येत नाही. त्यामुळे मंदिराची कामे राहिली बाजूला अन् अर्ध्याच्यावर कर्मचारी या व्हीआयपींना थेट दर्शनासाठी नेण्या-आणण्यातच व्यस्त असतात.

यामुळे रांगेतून येणाऱ्या भविकावर अन्याय होतो. यामुळे यंदा पेड ई-पास सुरू करण्यात आले आहे. यामुळे व्हीआयपी दर्शनासाठी तगादा लावणे कमी होणार आहे. मात्र, या पेड ईपास व्यवस्थेला काही जणांकडून विरोध होत आहे. देवीचे दर्शन ही आता पैसे देवून घ्यायचे का? सुविधा मिळत नाहीत मग पेड ई पास का? असा सवाल काही हिंदुत्ववादी संघटनेकडून होत आहे.

नेमकी कशी असणार पेड ई-पासची सुविधा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून यंदा भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, एकदा दोन दर्शन रांगा असणार आहेत, एक मोफत दर्शन रांग तर दुसरीही पेड ई-पास ची असणार आहे. मोफत दर्शन रांग ही लांबलचक असते. यामध्ये अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक तसेच परगावहून आलेले नागरिक अडकून बसतात त्यांना दर्शनासाठी अनेक तास या रांगेत उभारावे लागते यामुळे ज्यांना दर्शन रांगेत कमी वेळ घेऊन लवकरात लवकर दर्शना हवे आहे. अशांसाठी पेड ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पेड ई पासची किंमत दोनशे रुपये असून पेड इपास दर्शनासाठी टाईम स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांनी त्या टाइम स्लॉट मध्ये येऊन दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता येणार आहे. याबद्दल विशेष म्हणजे मोफत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रांग व पेड ई-पास असणाऱ्या भाविकांची रांग ही पुढे जाऊन एकत्र मिळणार आहे. यामुळे मोफत दर्शन आणि पेड ई पास यामध्ये केवळ वेळ कमी जास्त होणार आहे.

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग; भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे बदलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.