म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात मायलेकाचा करुण अंत झाला. उड्डाणपुलावर यू-टर्न घेत असलेल्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की मायलेक उड्डाणपुलावरून थेट खाली फेकले गेले अन् जागीच त्यांचा मृत्यू झाला.

योगेश्री कृष्णानंद आत्राम (वय ३०) आणि आलोक (वय ११, रा. भांडेवाडी) अशी या मृत मायलेकाची नावे आहेत. ही घटना गुरुवार, २५ मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास छावणीतील एसबीआय बँकेसमोरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर घडली. योगेश्री यांचे पती कृष्णानंद अवधूत आत्राम खासगी कंपनीत नोकरी करतात. योगेश्री या गृहिणी होत्या. आलोकला एक भाऊ आहे. आलोक आणि त्याच्या भावाच्या शाळेला सुट्या लागल्याने ते दोघे योगेश्री यांच्या गिट्टीखदान येथील माहेरी गेले होते. दरम्यान, आलोक आजारी पडला. त्यामुळे योगेश्री आणि कृष्णानंद या दोघांना घरी घेऊन जाण्यासाठी आले. ते गिट्टीखदान येथून त्यांच्या घरी जात होते. कृष्णानंद मोटारसायकल चालवित होते. त्यांच्यासोबत योगेश्री आणि आलोक होते.

फडणवीसांचे दौरे वाढताच राष्ट्रवादीने बालेकिल्ल्यात ताकद लावली, वर्धापन दिनानिमित्त मेळावा
तसेच आलोकचा मोठा भाऊ त्याच्या काकांच्या मोटारसायकलवर होता. यावेळी ते छावणी येथील उड्डाणपुलावर चढले. आपण रस्ता चुकल्याचा संशय कृष्णानंद यांना आल्याने त्यांनी यू-टर्न घेतला. यावेळी उड्डाणपुलावरून जात असलेल्या कारने (एमएच ४९ : बीएल ९९५७) त्यांना धडक दिली. यात योगेश्री आणि आलोक उड्डाणपुलावरून थेट खाली फेकले गेले. कृष्णानंद दुचाकीसह उड्डाणपुलावर पडले व गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, योगेश्री व आलोक यांच्या अशा अपघाती मृत्यूने आत्राम कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *