“टेडी बेअर” (Teddy Bear) जो अनेक कपल्ससाठी प्रेमाची निशाणी असतो. काही कपल्स एकमेकांना रिंग्स देतात, काही कपल्स एकमेकांना गुलाब देतात, तर काही कपल्स हे आठवण म्हणून एकमेकांना टेडी बेअर देतात. टेडी बेअर हा मुलींचा प्रचंड आवडीचा विषय. हा असा बाहुला जो तुम्ही कोणत्याही मुलीला दिला तरी तिच्या चेहऱ्यावर लगचे गोड असं हसू उमटेल. म्हणजे अशा मुली सापडणे फार कठीण ज्या म्हणतील की मला टेडी बेअर गिफ्ट म्हणून नको.

बाजारात तसे अनेक प्रकारचे टेडी विकत मिळतात. तुम्ही अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा हिरोईनच्या खोलीत एक भलामोठा टेडी पाहिला असले. तर अशा या टेडी बेअरबद्दल सांगायच्या गोष्टी खूप आहेत. त्यापैकी एक खास गोष्ट म्हणजे व्हेलेंटाईन विकला साजरा केला जाणारा टेडी बेअर डे हा का आणि कधीपासून साजरा केला जातो. किंवा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात विकला जाणारा टेडी नक्की कोणी निर्माण केला? तो प्रेमाचं प्रतिक का मानला जातो? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागची रोचक, भावूक आणि इंटरेस्टिंग कहाणी.

अमेरिकन राष्ट्रपतींचा संबंध

तर टेडी बेअर डे हा दिवस व्हेलेंटाईन विकमध्ये फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी कपल्स किंवा प्रियकर आपल्या प्रेयसीला टेडी बेअर गिफ्ट करतात. पण कुठून आली ही प्रथा किंवा कोणाला सुचली ही कल्पना? हा प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडला असेल. तर मंडळी, याचे उत्तर मिळते एका अमेरिकन राष्ट्रपतींच्या काळात! त्यांच्या सोबत एक प्रसंग घडला आणि तेव्हापासून हा टेडी बेअर बनवण्यात आला आणि टेडी डे साजरा करायला सुरुवात झाली असे इतिहास सांगतो.

(वाचा :- माझी कहाणी : नवरा फोन घेऊन पूर्ण दिवस बाथरूममध्ये बसलेला असतो, माहित नाही आत तो काय करतो, मला वेगळाच संशय येतोय)

राष्ट्रपती थियोडोर टेडी रूझवेल्ट

असे म्हणतात की, टेडी डे चे नाव हे अमेरिकन राष्ट्रपती थियोडोर ‘टेडी’ रूझवेल्ट यांच्या नावावरून पडले आहे. एकदा ते एका अस्वलाची शिकार करायला गेले पण त्या अस्वलाचा निष्पापपणा पाहून त्यांची त्याच्यावर बंदूक चालवण्याची त्यांची हिम्मतच झाली नाही आणि त्यांनी त्याची शिकार केली नाही. या प्रसंगानंतर त्यांनी थेट शिकारच सोडली आणि कोणत्याच प्राण्याला न मारण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यांची ही गोष्ट तेव्हा सगळीकडे पसरली आणि त्यांचे कौतुक करण्यात आले.

(वाचा :- काश..! नणंदेसोबत वाद घालण्याआधी मला ‘या’ गोष्टी समजल्या असत्या तर… माझ्यासोबत कधीच इतकी वाईट घटना घडली नसती..!)

बनवले एक सुंदरसे खेळणे

जेव्हा ही गोष्ट सगळीकडे पसरली तेव्हा त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना एक गोड आणि क्युट असा बेअर बाहुला अर्थात खेळणे ज्याला आपण सॉफ्ट टॉय सुद्धा म्हणतो ते गिफ्ट करण्यात आले. असे सांगितले जाते की 15 फेब्रुवारी 1903 रोजी न्यूयॉर्कच्या कॅन्डी स्टोरचे मालक मॉरिस मिचटॉम यांनी सर्वात आधी अधिकृतपणे पहिला टेडी बेअर बनवला होता.

(वाचा :- एकेकाळी माधुरी दीक्षित व संजय दत्तच्या लव्हस्टोरीच्या झडल्या होत्या जगभरात चर्चा, ‘त्या’ एका घटनेने तुटले नाते)

साजरा केला जाऊ लागला हा दिवस

तर इतिहासातील या प्रसंगानंतरच टेडी बेअर डे हा साजरा होऊ लागला असे म्हणतात. या मागचा उद्देश होता की एखाद्यावरचे आपले प्रेम आणि फिलिंग त्याला टेडी देऊन व्यक्त करणे होय. ही फिलिंग कोणत्याही नात्याबाबतची असू शकते. म्हणजे शिष्य आपल्या गुरूला देऊ शकतो. मुलगा आईला देऊ शकतो, वडिलांना देऊ शकतो. पण जसा जसा काळ बदलला तस तसे या दिवसाचे स्वरूप बदलले आणि आता सध्या आपल्या भारतात तरी केवळ प्रेमी जोडपेच आपल्या नात्याची आठवण म्हणून हा टेडी बेअर एकमेकांना देतात आणि आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करतात.

(वाचा :- पुरूषहो, बॉयफ्रेंड कोणीही चालेल पण नवरा बघताना या गोष्टी नोटीस करतात मुली, 3 नंबरवरील मुली सहजासहजी पटणं अशक्यच)

टेडीच्या विविध रंगांचे महत्त्व

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ज्या ज्या रंगाचा टेडी असतो त्या त्या रंगाचा एक अर्थ असतो. चला ते सुद्धा या निमित्ताने जाणून घेऊया. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही लाल रंगाचा टेडीच दिला पाहिजे. यातून तुमच्या भावना व्यक्त होतात. जर तुम्ही कोणा व्यक्तीला प्रपोज करणार असाल तर गुलाबी रंगाच टेडीच ऑफर करावा. जर त्या व्यक्तीने स्वीकारला तर होकार नाही तर नकार समजावा. ऑरेंज कलरचा टेडी देखील दिला जातो ज्यातून तुम्ही त्या व्यक्तीला तुम्हाला ती व्यक्ती आवडते अशा प्रकारच्या भावना व्यक्त करता. निळा रंगाचा टेडी आपण त्या व्यक्तीवर किती वेड्यासारखं प्रेम करतो हे सिद्ध करतो तर ग्रीन टेडी इमोशनल कनेक्शन आणि कमिटमेंटचं प्रतिक असतो, याचा अर्थ जर तुम्ही एखाद्याला ग्रीन टेडी दिला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच्या होकाराला कितीही वेळ लागला तरीही वाट पाहण्यास तयार आहात. तर मंडळी असं आहे हे सगळं टेडी बियरचं गौडबंगाल!

(वाचा :- माझी कहाणी : मी ज्या मुलीवर आकंठ प्रेम केलं ती माझी वहिणी बनणार आहे, भावाने माझं प्रेम व पत्नी दोन्ही हिरावलं..)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.