अजित पवारांना सोबत घेऊनच विधानसभा निवडणूक लढणार:नागपुरात अमित शहा यांनी केले जाहीर
महायुती विधानसभेची निवडणूक एकत्रित लढणार का, अजित पवार यांना सोबत घेणार काय असे प्रश्न रोज उपस्थित केले जात आहे. विरोधकही यात आणखी भर टाकत आहेत. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न भाजप आणि शिवसेनेच्या वतीने केले जात असल्याचेही आरोप होत असताना भाजपचे नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे अजित पवार यांना सोबत घेऊनच महायुती एकत्रितच लढणार असल्याचे जाहीर केले. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा कुठलाही भेदभाव न करता तसेच मनात किंतू परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. अमित शहा यांच्या वक्त्यव्यानंतर महायुतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या चर्चा थांबतील अशी अपेक्षा केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असे भाजपसह सर्वच पक्षांना वाटत होते. मात्र, महाराष्ट्रात निकाल वेगळे आले. महायुतीला फायदा होण्याऐवजी अधिकच नुकसान झाल्याचे दिसून आले. स्वत: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला. भाजपला सर्वाधिक फटका विदर्भात बसला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचे निष्कर्ष काढल्या जात होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक अजित पवार यांनासोबत घेऊन लढू नये, अशी जाहीर मागणी केली होती. मध्यंतरी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीसुद्धा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे महायुतीत मोठा विसंवाद असल्याचे दिसून येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा जाहीर कार्यक्रमांमधून महायुतीमधील कुठलाही घटकपक्ष दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली होती. टीका करताना त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही हेसुद्धा लक्षात ठेवावे असे आवाहन केले होते. असे असले तरी महायुती विशेषतः अजित पवार विधानसभेत एकत्रित लढेल की नाही याविषयी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कायम होती. अमित शहा यांनी आम्ही सर्व एकत्रितच लढणार असल्याचे जाहीर केल्याने आता शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.