अमित शहा सूर्य आहेत का? ते केवळ गृहमंत्री:मनोज जरांगे यांचा भाजपला टोला; ‘आरक्षण द्या अन्यथा पश्चाताप होईल’ असा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या राज्यातील महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अन्यथा त्यांना निवडणुकीत मोठा पश्चाताप होईल, असे ते म्हणालेत. अमित शहा यांच्यावर टीका न करण्यास ते काही सूर्य नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला हाणला. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर नुकतेच आंतरवाली सराटीत येथे उपोषण केले होते. त्यानंतर सध्या ते येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांनी शहांवर बोलणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे आहे असे म्हटले होते. मनोज जरांगे यांनी सोमवारी त्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. टीका न करण्यास शहा हे काही सूर्य नाहीत मनोज जरांगे म्हणाले की, टीका न करण्यासाठी अमित शहा हे सूर्य आहेत का? ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचे आंदोलन सरकारने गोडी गुलाबीनेच हाताळावे. त्यांनी मराठ्यांचा रोष पत्करू नका. अन्यथा आम्हाला नाईलाजाने आरे ला कारे म्हणावे लागले. पटेल, गुर्जर व पाटीदार एकत्र आले तर तुमचे अवघड होईल. मी राजकीय भाषा करत नाही. राजकारणही करणार नाही. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढेच माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणणे आहे. सरकार आता अभ्यासकांशी चर्चा सुरू असल्याचा दावा करत आहे. आता त्यांना अभ्यासक कशाला हवेत? मी सरळ सांगतो, अभ्यासकांना चर्चेला बोलावण्याचे नाटक बंद करा. 13 महिने झाले त्यांना हे अभ्यासक आठवले नाही. आताच त्यांना हे का आठवले? हा सरकारचा ट्रॅप असेल तर त्यांना काहीही मिळणार नाही. मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केला नाही तर आगामी निवडणुकीत त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर मेळावा मनोज जरांगे यांनी यावेळी दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर आपला दसरा मेळावा होणार असल्याचीही घोषणा केली. दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वा. नारायण गडावर आपला मेळावा होईल. मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजानेही मोठ्या संख्येने तिकडे यावे. सर्वांनी एकजूट दाखवावी. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही. पण मराठा समाज तिथे आपली एकी दाखवेल, असे जरांगे म्हणाले. हे ही वाचा… सरकार विषकन्या आहे हे मोदी – शहांना सांगा:संजय राऊत यांचा गडकरींना टोला; शिंदेंना दसरा मेळावा सुरत, गुवाहाटीला घेण्याचा टोला मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप व राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही. कारण हे सरकार विषकन्या आहे असे गडकरी म्हणाले होते. त्यांचे हे विधान बरोबर आहे. पण ते स्वतःच सत्तेच्या या विषकन्येसोबत बसलेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर