जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतल्याचा दावा केला होता. आता एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी सासरेबुवांची दिल्लीत अमित शाहांशी भेट झाली नाही, मात्र फोनवरुन चर्चा झाली, असं सांगितलं. एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्यातील चर्चेमागचा सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे याच विषयावरुन एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे.

दिल्लीत अमित शाहांची भेट झाली नाही, मात्र एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे असल्याची माहिती भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. मात्र यावरुन लोकांना राजकारण करायचं असेल तर, ते करणारच, असा टोलाही रक्षा खडसे यांनी नाव न घेता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली असल्याचा दावा केला होता. तसेच काल पुन्हा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकार परिषदेत खडसे यांनी अमित शहांची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला होता. दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसे हे भाजपात जाणार की काय अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत. यावर रक्षा खडसे यांना विचारले असता, काही जण याविषयाचं राजकारण करत असून खडसे राष्ट्रवादीतच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते भाजपात परत येणार का याबाबत कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : रश्मी ठाकरेंना महिला शिवसैनिकांनी खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकनाथ खडसे यांची अमित शहांची भेट झाली का याबाबत खासदार रक्षा खडसे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, अमित शाहांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे व मी दिल्लीत गेले होते, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे अमित शाहांची भेट झाली नाही. मात्र यानंतर एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली, असं त्या म्हणाल्या. काय चर्चा झाली आहे असे विचारले असता, रक्षा खडसे यांनी उत्तर देणे टाळले. तसेच खडसे भाजपमध्ये परतणार आहे का असे विचारले असता, मला तर माहित नाही, मात्र आता तरी मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी असल्याचंही त्या म्हणाल्या. मात्र एकनाथ खडसे व अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, खडसे पुन्हा भाजपात जाणार का, आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : VIDEO | मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी, शेजारी बसून संदिपान भुमरेंचा आँखों ही आँखों में इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.