लाभार्थींना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा:अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशात नागपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अमित शाह यांनी बंडखोरी किंवा मतभेदातून होणारी फूट खपवून घेतली जाणार नाही, असा थेट सज्जड दमच भरला आहे. तसेच यावेळी अमित शाह यांनी निवडणूक विजयाचा फॉर्म्युला देखील सांगितला आहे. अमित शाहांनी दिला विजयाचा फॉर्म्युला
अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रात 2 कोटी 47 लाख शासकीय योजनांचे लाभार्थी असून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. त्यामुळे या लाभार्थींना निवडणुकीपर्यंत किमान तीन वेळेला भेटायचे आहे, बोलायचे आहे, सरकारचे काम सांगायचे आहे, असा निवडणूक विजयाचा फॉर्म्युलाच त्यांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांना दिला आहे. काँग्रेसला विदर्भात पराभूत करणे आवश्यक
पुढे अमित शाह म्हणाले, काँग्रेस विरोधात भाजप ज्या जागा हरेल, त्या जागांच्या जोरावर काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल म्हणून काँग्रेसला विदर्भात पराभूत करणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकांमध्ये बूथ प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे, बूथवर दहा टक्के मत वाढवायची आहेत. येत्या नवरात्रीनंतर सुरू होणाऱ्या विजयादशमी ते धनत्रयोदशी या 11 दिवसांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांनी बुथ क्षेत्रात बाईक रॅली काढाव्या, प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. विरोधी पक्षाचे बुथ रिकामे करा
निवडणुकीची पुढील रणनीती सांगताना अमित शाह म्हणाले, सरपंच पदाची निवडणूक पराभूत झालेल्या लोकांना भेटून त्यांना पक्षाशी जोडा, बुथवर विरोधी पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपल्या पक्षाशी जोडा. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर आपल्या पक्षात आले, म्हणून तुमचं फारसा नुकसान होणार नाही. कारण ते बुथवरचे कार्यकर्ते आहेत, ते काय घेऊन जाणार, त्यामुळे जोरदार प्रयत्न करून विरोधी पक्षाचे बुथ रिकामे करा, त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडा, असे निर्देश शाह यांनी दिले आहेत. जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवारी देत असतात
राज्यातील सर्वच बचत गटाच्या महिलांना जोडा, सहकार क्षेत्रातील लोकांना पक्षाशी जोडा. पक्षांतर्गत मतभेद दूर करा, एक होऊन निवडणुकीला सामोरे जा. पार्टी जेव्हा उमेदवारी देते, तेव्हा पार्टीसमोर अनेक प्रश्न असतात. अनेक समीकरणे पाहावे लागतात, तेव्हा पक्षातील वरिष्ठ नेते मैत्री पाहत नाहीत, तर जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवारी देत असतात, असेही अमित शाह यांनी सांगितले.