रोहित पवारांच्या डोक्यात 50 टक्के शेण भरलेले:त्यामुळेच ते बालिश वक्तव्य करतात, अमोल मिटकरी यांची जहरी टीका
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे 10 ते 12 आमदार निवडून येणार नाहीत, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. या वक्तव्यावरून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांचा समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांच्या डोक्यात 50 टक्के शेण भरले असल्यामुळे ते बालिशपणाने बोलतात, अशी जहरी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, रोहित पवार यांच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर त्यात शेण आणि किडे भरलेली दिसतील. त्यामुळे ते वेड्याप्रमाणे बालिश वक्तव्य करत आहेत. लाडकी बहीण योजनेला महिलांची पसंती मिळत असल्यामुळे त्यांच्या मेंदुतील किडे वळवळले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत, त्यामुळे अशा मूर्खांबद्दल बोलणे मला योग्य वाटत नाही, अशी टीकाही मिटकरी यांनी केली आहे. रोहित पवारांची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही रोहित पवारांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. त्यांनी आधी स्वत:ची लायकी काय आहे हे तपासून पहावे. त्यांच्यात जातीय अहंकार आणि मस्तवालपणा भरलेला आहे. त्यामुळे त्यांची अजित पवारांवर बोलण्याची लायकी नाही. अजित पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच रोहित पवारांनी त्यांच्या पक्ष वाढीसाठी आपल्या तोंडाचा पट्टा चालवावा, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी दिला आहे. यामुळे रोहित पवारांवर साधला निशाणा रोहित पवार 2019 मध्ये कर्जत-जामखेड मतरारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. यंदा पुन्हा त्यांनाच महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे शरद पवारांसोबत बंड करून राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यामुळे रोहित पवार यांनी त्यांना सातत्याने लक्ष केले आहेत. रोहित पवार अजित पवारांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला आहे. हेही वाचा… रोहित पवार मुख्यमंत्री होणार?:रोहित पुढची 5 वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल, शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर बातमी वाचा… निवडणुकांमध्ये जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल:रोहित पवार यांचा विश्वास; सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा सुपडा साफ केला आहे. यातील दहापैकी 10 जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला आहे. सविस्तर बातमी वाचा…