अमरावती : पोलीस हे सर्वसामान्यांना संरक्षण देत त्यांच्या न्यायासाठी धडपडणारी यंत्रणा आहे. सण समारंभ असो की यात्रा मिरवणुका पोलीस आपले कर्तव्य करत असतात. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतात. मात्र याच व्यवस्थेला कीड लावणारे अनेक लाचखोर अजूनही खात्यात सक्रिय असल्याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यात पुन्हा आला आहे. ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेतीलच दोन पोलिसांनी अवघ्या पंधराशे रुपयाची लाच स्वीकारत आपल्या खात्याची अब्रू घालवली असल्याची घटना उघडकीस आली.

तीवसा येथील तक्रारदार यांच्यावर कलम ११० प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक केस निकाली काढण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पोलीस कर्मचारी विशाल हरणे आणि प्रशांत महादेवराव ढोके यांनी १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी १० ऑगस्टला तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी विशाल हरणे व प्रशांत महादेवराव ढोके यांनी तक्रारदार यांना ११० चे प्रतिबंधक कार्यवाही लवकर निकाली काढण्याकरिता दीड हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
मैत्रीच्या नात्याला काळिमा! फक्त २२ हजारांसाठी मित्राने केला घात, पुढे जे केले ते संतापजनकच

या प्रकरणी कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी विशाल हरणे यांनी तक्रारदाराकडून एकूण लाच रक्कमे पैकी पाचशे रुपये लाच रक्कम स्वीकारली. यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक, संजय महाजन यांनी दिली आहे.

Eknath Shinde : आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; या शाळेची मान्यता रद्द, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्काSource link

Leave a Reply

Your email address will not be published.