कोलंबोमधील Weather.com नुसार रविवारी पावसाची ८० टक्के शक्यता होती. पण कोलंबोमधली सकाळ अप्रतिम आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी ट्विटरवर कोलंबोच्या हवामानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतील एक भाग सोडला तर संपूर्ण आकाश स्पष्ट दिसत आहे. सूर्यप्रकाशही दिसत आहे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून हवामान चांगले दिसत आहे. मात्र, कोलंबोचे हवामान किती झपाट्याने बदलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आज दिवसभर कोलंबोतील हवामान असेच राहण्याची अपेक्षा आहे आणि क्रिकेटप्रेमींना भारत आणि श्रीलंका यांच्यातील जबरदस्त फायनल पाहायला मिळेल. मात्र, पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. तर त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने त्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. अशा स्थितीत आजचा सामना जिथे थांबला होता, त्याच ठिकाणाहून उद्या सुरू होईल आणि षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. पण कोलंबोमध्ये सध्या पाऊस नाही, म्हणजे सकाळी थोडा सूर्यप्रकाशही आहे.
अंतिम फेरीसाठी भारताची संभाव्य इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
फायनलसाठी श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदिरा समराविक्रमा, चारिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालगे, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना आणि दुशान हेमंथा