तेजस्विनी पंडित

रानबाजार फेम अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार बोलायला आवडत नाही.तिनं तिचा बालपणीचा मित्र आणि भूषण भोपचे याच्याशी १६ डिसेंबर २०१२ रोजी लग्न केलं होतं. तेजस्विनीनं कधीही घटस्फोटाबद्दल काही सांगितलं नाही. तिनं यावर कधीही भाष्य केलं नाही. परंतु लग्नानंतर काही वर्षानंतर दोघेही विभक्त झाले. तेजस्विनीनं सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित केलंय. आता ती निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्मिता गोंदकर

बिग बॉस मराठी सीझन १ ची स्पर्धक आणि ‘पप्पी दे पारुला’ गाणे फेम स्मिता गोंदकर हिच्या खासगी आयुष्याची नेहमी चर्चा होते. काही वर्षांपूर्वी नगरसेवक सिद्धार्थ बांठियासोबत तिनं लग्न केलं होतं. पण सिद्धार्थ बांठियानं तिला फसवून लग्न केल्याचा आरोप स्मितानं त्याच्यावर केला होता. स्मितानं त्याच्यावर गैरवर्तन आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यापासून विभक्त झाली. स्मिता सध्या सिंगल आहे आणि तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवते.
शाल्मली टोळे

अभिनेता पियुष रानडेचं पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत झाले होतं. २०१०मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र फार काळ हे नातं टिकलं नाही. २०१४मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. शाल्मलीनं घटस्फोटानंतर सिंगल पाहण्याला पसंती दिली.
मयुरी वाघ

अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. पियुषचं हे दुसरं लग्न आहे. पियुषचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत झाले होते. २०१०मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र फार काळ हे नातं टिकलं नाही. दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. शाल्मलीपासून विभक्त झाल्यानंतर अस्मिता या मालिकेच्या सेटवर मयुरीसोबत पियुषचे सुत जुळले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या नात्याचे रुपांतर या दोघांनी लग्नात करण्याचा निर्णय घेतला. सध्या मयुरी आणि पियुष यांच्याकतही सारं काही अलबेल नसल्याच्याही चर्चा सुरू आहेत.
तेजश्री प्रधान

मालिकांमध्ये एकत्र काम करत असताना तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली होती. दोघांमधली जवळीकही वाढली होती. दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला होता. पण हा सुखद धक्का काही काळापुरताच होता. लग्नानंतर वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी नंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. मराठी प्रेक्षकांसाठी हा घटस्फोट धक्कादायक होता. शशांकनं पुन्हा लग्नगाठ बांधली, तर तेजश्री सध्या सिंगल आहे.
उषा नाडकर्णी

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बिग बॉस हाऊसमध्ये खुलासा केला होता की, काही वर्षांपूर्वी त्या त्यांच्या पतीपासून विभक्त झाल्या आहेत. अभिनेत्रीनं असंही सांगितलं की त्या त्यांच्या घरात एकट्याच राहतात आणि त्यांना स्वतःची कंपनी आवडते.