मुंबई: करण जोहर याच्या बहुचर्चित अशा कॉफी विथ करण ७ (Karan Johar Koffee With Karan) कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या पत्नी सहभागी झाल्या आहेत. त्यात चंकी पांडे याची बायको भावना पांडे, संजय कपूर याची बायको महीप कपूर आणि शाहरुख खान याची बायको गौरी खान सहभागी झाल्या आहेत. या तिघींच्या आयुष्यातील अनेक किस्से, अनेक गुपीतं करणनं त्यांच्याशी बोलता बोलता काढून घेतली. यावेळी करणनं अनन्या पांडे ही एकाच वेळी दोन मुलांना डेट करत असल्याचं जेव्हा सांगितलं, तेव्हा भावना पांडे हिनं आपल्या लेकीचा बचाव करत तिची पाठराखण केली. काही महिन्यांपूर्वी अनन्या आणि ईशान खट्टर यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे.


अनन्याच्या रिलेशनबद्दल काय म्हणाली भावना

कॉफी विथ करण ७ कार्यक्रमातल्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करणनं गौरीला काही प्रश्न विचारले. त्यात डेटिंगबद्दल सुहानाला तू काय सल्ला देशील असा प्रश्न गौरीला विचारला. त्यावर गौरीनं उत्तर दिलं की, ‘कधीही एकाच वेळी दोन मुलांना डेट करू नकोस.’ त्यावर करण तिला म्हणतो ‘चांगला सल्ला आहे हा.’

हे वाचा-अयोध्येचं नवं आकर्षण! लता मंगेशकर चौकात उभारली ४० फुटांची वीणा

त्यानंतर करण त्याचा मोर्चा भावना पांडे हिच्याकडे वळवतो. करण तिला म्हणतो की,’मला असं वाटतं की हे असं अनन्यानं केलं आहे.’ ते ऐकल्यावर भावना आश्चर्यचकीत होते आणि म्हणते ‘असं तिनं केलंय?’ करण तिला उत्तर देतो की,’हो. माझ्यामते असं तिनं केलंय.’ यावर भावना त्याला म्हणते की,’नाही नाही.. ती दोघांचा विचार करत होती त्यामुळे तिनं एकाबरोबर ब्रेकअप केलं असावं.’ तिचं हे बोलणं ऐकून सर्वजण हसू लागतात.


काय आहे अनन्याचं रिलेशनशिप स्टेटस?

करणच्या कॉफी विथ करण ७ कार्यक्रमाच्या सातव्या भागामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सहभागी झाले होते. या दोघांनी लायगर सिनेमात एकत्र काम केलं आहे. करणनं यावेळी अनन्याला प्रश्न विचारला की, ‘ईशान खट्टर याच्याबरोबर डेट करत असताना तू विजयबरोबर डेटला गेली होतीस?’ त्यावर अनन्यानं उत्तर दिलं की ‘आमची ती मैत्रीपूर्ण डेट होती.’

हे वाचा-१७ वर्षात किंचितही बदलला नाही ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा यश, पाहा हा Photo

अनन्यानं पुढे सांगितलं की, ‘मी सिंगल आहे. मला कुणीही विचारलेलं नाही परंतु मीच सांगते की मी एकटी आहे.’ त्यावर करण तिला विचारतो की, ‘तुझं आणि ईशानचं ब्रेकअप झालंय का?’ त्यावर अनन्या तिला काहीच ऐकू आलं नाही असं दाखवते. त्यावर करण तिला परत विचारतो की, ‘तू आणि ईशान डेटिंग करत होते. परंतु तुमचं आता ब्रेकअप झालं आहे. चल तू ईशानला डेटिंग करत होतीस हे सगळ्यांनाच माहिती आहे.’ करण तिला पुढं म्हणतो की, ‘तू कार्तिक आर्यनला देखील डेटिंग करत होतीस का?’ त्यावर अनन्या सांगते की आम्ही चांगले मित्र आहोत. करणनं विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अनन्या म्हणते की, आदित्य रॉय कपूर हा देखील खूप हॉट आहे.

करणच्याच कार्यक्रमात काही दिवसांनंतर ईशान खट्टर, कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी आले होते. त्यावेळी करणने ईशानला विचारलं होतं की, ‘अलिकडेच तू अनन्याबरोबरचं तुझं नातं तोडलं…’ त्याला ईशान आक्षेप घेतो आणि म्हणतो की, ‘ते मी तोडलं. कारण तू म्हणालास की तिनं माझ्याबरोबरचं नातं तोडलं…’ करण त्याला म्हणतो की ब्रेकअप हे दोघांनी समजूतीनं करायचे असते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.