बाथरूमचा तुमचे आरोग्य आणि आयुष्य यांच्याशी मोठा संबंध असतो. एका रिपोर्टच्या आकडेवारीवरून हे कळून येते की, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची जवळपास दीड वर्षे (1.05 YEAR) ही बाथरूममध्ये घालवतो. त्यापेक्षा मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याचे 6 महिने हे अंघोळ करण्यातच घालवतो. ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मान्य करालच की स्वच्छता बाळगणे हे मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे यात नवल वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. स्वच्छता नाही बाळगली तर काय हे सुद्धा आपण सर्व जाणतोच.

त्यामुळे अधिकाधिक वेळ स्वच्छता करणे यात चूक काही नाही पण काही लोक असे आहेत जे बाथरूममध्ये अनेक गंभीर चुका करतात. ज्या त्यांच्याकडून अनवधानाने होतात पण त्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. भलेही त्यावेळी आपल्याला समजत नाही पण भविष्यात त्याचा थेट परिणाम आरोग्यावर वाईट पद्धतीने होतो. या चुका आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही ताबडतोब बदलल्या पाहिजेत.

वर्कआउट केल्यावर लगेच अंघोळ न करणे

जर तुम्ही वर्कआउट केल्यावर लगेच अंघोळ करत नसाल तर ही चूक पुन्हा करू नका आणि लगेच आजपासूनच स्वत:ला सवय लावा की वर्कआउट झाल्यावर तुम्ही लगेच अंघोळ कराल. अनेकजण ही गोष्ट करतात सुद्धा पण त्यांना त्या मागचे खरे कारण माहित नसते. अनेकांना वाटते की वर्कआउट केल्याने घाम येतो आणि त्याचा वास येतो म्हणून अंघोळ करावी. पण असे नसून हा घाम त्वचेत आत जाऊन विषाणू निर्माण करू शकतो. ज्यामुळे शरीरावर पुरळ येण्यासोबतच अनेक त्वचेचे संसर्ग होऊ शकतात म्हणून लगेच अंघोळ करावी.

(वाचा :- दारूपेक्षाही विषारी आहे हे ड्रिंक, रोज प्यायल्यामुळे तरूणाचे सर्व अवयव झाले खराब, पित असाल तर ताबडतोब सावधान..!)

झोपण्याआधी थंड पाण्याने अंघोळ करणे

सकाळी सकाळी थंड पाण्याने अंघोळ केल्याचे खूप फायदे आहेत. यामुळे ताणतणाव अर्थात स्ट्रेस कमी होतो. इम्यूनिटी सिस्टम खूप मजबूत होते, अस्वस्थता कमी होते. पण हीच गोष्ट तुम्ही रात्री झोपताना केली तर मात्र त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक जाणकार सुद्धा सांगतात की झोपण्याआधी जर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला अनिद्रेची समस्या होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही रात्री झोपण्याआधी थंड पाण्याने अंघोळ करत असाल तर तसे अजिबात करू नका.

(वाचा :- Long Life Secret: मजबूत व 100 पेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगण्यासाठी करा ही 6 कामे, म्हातारपणीही होणार नाहीत आजार)

रोज अंघोळ करणे आणि केस धुणे

ज्या लोकांचे केस पातळ वा कमजोर असतात त्यांनी ते रोज न धुतलेलेच उत्तम कारण केस धुताना अनेक केस गळून जाण्याची शक्यता असते. तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर आठवड्यातून दोन वेळाच धुवावे. यामुळे केसांमध्ये आर्द्रता संतुलित राहते. टुडेवर प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, रोज अंघोळ केल्याने त्वचेत जळजळ होऊ शकते आणि शरीरातील आर्द्रता किंवा ओलावा कमी होऊ शकतो. कारण पाणी हे चांगले बॅक्टेरिया धुवून टाकते. यामुळे त्वचेतील संक्रमण सुद्धा वाढू शकते. त्यामुळे या गोष्टीवर देखील तुम्ही विचार करू शकता.

(वाचा :- भले कितीही भूक लागुदे पण ‘या’ वेळी अजिबात एक घासही खाऊ नका, 25 टक्के वाढेल कॅन्सरचा धोका – स्टडीमध्ये दावा..!)

शॉवर हेड साफ न करणे

जर तुम्ही रोज अंघोळीसाठी शॉवरचा वापर करत असाल आणि शॉवर हेडच्या खाली उभे राहून मस्त आंघोळीचा आनंद लुटत असाल तर त्यात काही वावगे नाही. पण हा शॉवर हेड वेळोवेळी साफ करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. यात जर घाण जमा झाली तर ती तुमच्या केसांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा वाईट ठरू शकते. एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना आढळले आहे की, शॉवर हेडमध्ये बॅक्टेरिया असू शकतात आणि ते फुफ्फुसांच्या रोगांना आमंत्रण देऊ शकतात.

(वाचा :- जेनेटिक लठ्ठपणाशी झुंजणा-या डॉक्टरने जिम व डाएट न करता या 1 ट्रिकने घरीच घटवलं तब्बल 35 किलो वजन, बनली प्रेरणा)

खूप दिवस एकाच टॉवेलचा वापर

जर तुम्ही अनेकजण घरात एकाच टॉवेलचा वापर करत असला तर ही एक मोठी चूक आहे आणि तुम्हाला यातून अनेक आजारांचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे शक्य असल्यास टॉवेल वेगळे ठेवा. या शिवाय जर तुम्ही एकच टॉवेल खूप काळ वापरत असाल तर तो सुद्धा आरोग्यासाठी घातकच आहे. जर तुम्ही ओला टॉवेल वापरत असाल तर ती सवय देखील बदला कारण या ओल्या टॉवेलमध्ये बॅक्टेरिया असू शकतात. तर मंडळी, या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून अनवधानाने होत असतात. त्या सामान्य वाटत असल्या तरी आजारांना आमंत्रण देऊ शकतात. मायक्रोबायोलॉजिस्ट फिलिप टिएर्नो सांगतात की टॉवेल धुण्याआधी 3 पेक्षा जास्त वेळा वापरणं धोकादायक ठरू शकतं.

(वाचा :- Prediabetes : डायबिटीज सुरू होण्याआधीच मुळापासून संपवतात किचनमधील या 4 आयुर्वेदिक गोष्टी, वाढतच नाही ब्लड शुगर)

अंघोळीनंतर बाथटम किंवा बादली न धुणं

आंघोळीनंतर लगेच बादली किंवा बाथटब धुण्यास विसरू नका. ओलाव्यामुळे त्यात ई कोलाई यासारखे जीवाणू किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात. बादली नियमित धुतल्यास संसर्ग टाळता येतो. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- Ayurveda Diet Tips: रात्री खात असाल हे 5 पदार्थ तर शरीरात जमा होतील भयंकर विषारी पदार्थ, डॉक्टरांची चेतावणी..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.