सफियाबादवाडीचे अनिल भोसले यांचा प्रयोग यशस्वी‎:योग्य निगराणीसह मुक्त संचार गोठा; गाय देते ३२ लिटर दूध

सफियाबादवाडीचे अनिल भोसले यांचा प्रयोग यशस्वी‎:योग्य निगराणीसह मुक्त संचार गोठा; गाय देते ३२ लिटर दूध

मुक्त संचार पद्धतीने गायींचे पालन, चारा व्यवस्थापन, योग्य निगराणीची सांगड घालत दिवसाला प्रत्येक गायीपासून ३२ लिटर दुधाचे उत्पादन घेत वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडीचे शेतकरी अनिल भोसले यांनी प्रगती साधली आहे. शिवाय एका गाईपासून सुरू केलेल्या दूध व्यवसायाला आता त्यांनी आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून, दूध व्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल्याचेही ते सांगतात. सफियाबादवाडी येथील अनिल बाळनाथ भोसले यांना वडिलोपार्जित १ एकर १० गुंठे शेतजमीन आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, गहू आदी पिके ते घेत. मात्र, दुष्काळी पट्टा असल्याने वारंवार नापिकीला सामोरे जाण्याची वेळ अनिल यांच्यावर आली. ज्यातून पुढे कर्जबाजारीपणा वाढला आणि आता शेतीला जोडधंदा हवा, या हेतूने त्यांनी परिसरातून एका एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन) गाईची खरेदी केली. पुढे दूध व्यवसायाचे नवनवीन तंत्र अवगत करत सोबत काही गायींची नव्याने खरेदी देखील अनिल यांनी केली. त्यांच्याकडे सध्या उच्च दूध क्षमतेच्या ५ गाई आहेत. कमी गाईत अधिक दूध सुरुवातीला दहा-बारा गाई असून देखील गोठ्यातून केवळ ७०-८० लिटर दूध उत्पादन व्हायचे. मात्र, आता हेच दूध उत्पादन केवळ ५ गाईंपासून सुरू आहे. ज्याचे, कारण म्हणजे आज घडीला दिवसाकाठी ३२ लिटर दूध देणारी गाय गोठ्यात आहे. या दुधाला डेअरीवर ३० रुपये लिटरचा दर मिळत आहे. दुधाच्या नफ्यावर घर बांधले, दुचाकी घेतली, विहीर बांधली ^आज एक आरसीसी घर, दुचाकी, शेतात सिंचनाकरिता विहीर हे सर्व केवळ या दूध व्यवसायातून आलेल्या नफ्यावर झाले आहे, तर सोबत मुलांचे शिक्षण हे देखील दूध व्यवसायावर सुरू आहे. अनेकदा संकटे आली. मात्र, दूध व्यवसाय टिकवून ठेवला, लढण्याची जिद्द ठेवली, वेळेनुसार आधुनिक नवनवीन बदल केले. ज्यातून आजची आर्थिक प्रगती ही साधता आली आहे. – अनिल भोसले, दूध व्यावसायिक

​मुक्त संचार पद्धतीने गायींचे पालन, चारा व्यवस्थापन, योग्य निगराणीची सांगड घालत दिवसाला प्रत्येक गायीपासून ३२ लिटर दुधाचे उत्पादन घेत वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडीचे शेतकरी अनिल भोसले यांनी प्रगती साधली आहे. शिवाय एका गाईपासून सुरू केलेल्या दूध व्यवसायाला आता त्यांनी आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून, दूध व्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल्याचेही ते सांगतात. सफियाबादवाडी येथील अनिल बाळनाथ भोसले यांना वडिलोपार्जित १ एकर १० गुंठे शेतजमीन आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, गहू आदी पिके ते घेत. मात्र, दुष्काळी पट्टा असल्याने वारंवार नापिकीला सामोरे जाण्याची वेळ अनिल यांच्यावर आली. ज्यातून पुढे कर्जबाजारीपणा वाढला आणि आता शेतीला जोडधंदा हवा, या हेतूने त्यांनी परिसरातून एका एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन) गाईची खरेदी केली. पुढे दूध व्यवसायाचे नवनवीन तंत्र अवगत करत सोबत काही गायींची नव्याने खरेदी देखील अनिल यांनी केली. त्यांच्याकडे सध्या उच्च दूध क्षमतेच्या ५ गाई आहेत. कमी गाईत अधिक दूध सुरुवातीला दहा-बारा गाई असून देखील गोठ्यातून केवळ ७०-८० लिटर दूध उत्पादन व्हायचे. मात्र, आता हेच दूध उत्पादन केवळ ५ गाईंपासून सुरू आहे. ज्याचे, कारण म्हणजे आज घडीला दिवसाकाठी ३२ लिटर दूध देणारी गाय गोठ्यात आहे. या दुधाला डेअरीवर ३० रुपये लिटरचा दर मिळत आहे. दुधाच्या नफ्यावर घर बांधले, दुचाकी घेतली, विहीर बांधली ^आज एक आरसीसी घर, दुचाकी, शेतात सिंचनाकरिता विहीर हे सर्व केवळ या दूध व्यवसायातून आलेल्या नफ्यावर झाले आहे, तर सोबत मुलांचे शिक्षण हे देखील दूध व्यवसायावर सुरू आहे. अनेकदा संकटे आली. मात्र, दूध व्यवसाय टिकवून ठेवला, लढण्याची जिद्द ठेवली, वेळेनुसार आधुनिक नवनवीन बदल केले. ज्यातून आजची आर्थिक प्रगती ही साधता आली आहे. – अनिल भोसले, दूध व्यावसायिक  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment