मुंबई :आई कुठे काय करते मालिकेतल्या अनिरुद्ध या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांना नेहमीच राग येतो. तर्कट, तापट, असंवेदनशील अनिरुद्ध फारसा कोणाला आवडत नाही. पण अनिरुद्धची भूमिका करणारे मिलिंद गवळी हे मात्र चाहत्यांमध्ये प्रिय आहे. ते सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. त्यातन त्यांची संवेदनशीलता, दिलखुलासपणा जाणवत राहतो.

आताही त्यांनी इन्स्टाग्रामवर सचिन या चित्रकाराबद्दल लिहिलं आहे. ते सचिन जुवाटकर यांना आध्यात्मिक चित्रकार म्हणतात. अभिनेत्यानं लिहिलं आहे, ‘पहाटे तीन वाजता उठून हजारो जप करून, परमेश्वराची आराधना करून, मग चित्र काढायला ब्रश हातात घेऊन, चित्राची सुरुवात केली की साक्षात परमेश्वरच त्याच्यामध्ये अवतरतो आणि एक अद्भुत चित्र साकार होतं. काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी काढलेलं कृष्णाचx एक अप्रतिम चित्र सचिनजींनी मला भेट दिलं, त्या चित्राकडे पाहिलं की बासरीची धून कानावर पडते आहे असा भास होत राहतो.’

ब्रह्मास्त्रमध्ये ईशा का घेत असते शिवाचं नाव, अयानने सांगितलं कारण

मिलिंद गवळी लिहितात, ‘माझी आणि सचिनजींची भेट नेहरू प्लॅनेटोरियमच्या आर्ट गॅलरीमध्ये लहू माधव यांनी करून दिली होती. सचिनजींच्या चित्रकला प्रदर्शनाला आम्ही भेट दिली होती. हा प्रसंग अविस्मरणीय आहे. प्रदर्शनात पंडित जसराज यांचं चित्र होतं, मी सचिनजींना सांगत होतो की पंडित जसराज यांचे आणि माझे खूप जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेच. वाक्य पूर्ण होत नाही की लगेच माझा फोन वाजला आणि फोन होता आई मधुरा जसराज यांचा. टेलिपथी किंवा डिवाइन कनेक्शन आहे का हे, मला माहीत नाही. कल्पनेच्या पलिकडच्या गोष्टी आहेत एवढं नक्की.’

पुढे ते म्हणतात, ‘मागच्या आठवड्यात सकाळी बासरीचे आवाज कानावर आले, बासरीवाला बासऱ्या विकण्यासाठी बासरी वाजवत होता. त्याला घरी बोलवून मी काही बासऱ्या विकत घेतल्या आणि फोन वाजला तर सचिनजींचा फोन होता, म्हणाले गणेशाचे चित्र तुम्हाला भेट द्यायचं आहे. तुम्ही घरी आहात का? मी म्हटलं लगेच या. ह्याला डिवाइन कनेक्शन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. त्यांना बासऱ्या भेट देऊन जे समाधान मला मिळालं ते शब्दात नाही मांडता येणार.’

प्रिया बापटनं दाखवलं तिचं ग्रेट बर्थडे गिफ्ट, हा Video पाहा म्हणजे तुम्हालाही कळेल!

बयो स्वतः सांगतेय, छोट्या बयोच्या मोठ्या स्वप्नाच्या शुटिंगची गोष्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.