अंजली दमानियांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करणार:धनंजय मुंडे यांचा इशारा; तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल, दमानियांचा पलटवार

अंजली दमानियांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करणार:धनंजय मुंडे यांचा इशारा; तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल, दमानियांचा पलटवार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच अंजली दमानिया यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा अनेक आरोप धनंजय मुंडे यांच्यावर लावले आहेत. आता यावर आपण अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हंटले, अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आता ट्विट केले आहे. यावर अंजली दमानिया यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा, ह्यात तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल ह्यात मला काडीमात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस हाई कोर्टात लढेन, असे त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, अंजली दमानिया यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेत कृषी विभागाने मार्च 2024 मध्ये राबवलेल्या विविध खरेदी बाबत अर्धवट माहितीच्या आधारे व एका वेबसाईटवरील भावांचे संदर्भ देत काही वस्तूंची चुकीच्या पद्धतीने खरेदी झाल्याचे आरोप करत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. तसेच सदरील खरेदी प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर तत्कालीन कृषी मंत्री व सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा सादर केला तसेच संपूर्ण प्रक्रिया ही खरेदी प्रक्रियेच्या नियमातील तरतुदीनुसार तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वित्त यांच्या मान्यतेनुसारच झाली होती असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, नॅनो खते देणाऱ्या इफको कंपनीकडून भारतात सर्वत्र एकाच दराने ही खते विकली जातात. मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने तरीसुद्धा संबंधित कंपनीकडे जवळपास आठ रुपये प्रति लिटर इतका दर कमी करण्यात आला होता तसेच हा दर देशात सर्वात कमी महाराष्ट्रात होता ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर ने स्प्रे पंप खरेदी, कापूस भरणा बॅग खरेदी तसेच गोगलगाईंचा प्रादुर्भाव नष्ट करणाऱ्या मेटलडीहाईड या रसायन्याची खरेदी सुद्धा प्रमाणित शासकीय दराप्रमाणे तसेच अतिशय पारदर्शक पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवूनच करण्यात आले होते हे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट होते. अंजली दमानिया बिनबुडाचे व खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि मीडियावर प्रसिद्धी मिळवून आपले हेतू साध्य करून घेतात असा धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप अंजली दमानिया यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत असून आता अंजली दमानिया या विचलित झाल्या असून पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आल्या व बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत सुटल्याचे दिसून आले. मागील 58 दिवसांपासून कुठल्याही तपास प्रक्रियेवर काही प्रभाव पडू नये म्हणून शांत व संयमाने राहिलेले धनंजय मुंडे यांनी मात्र आता अंजली दमानी यांच्या खोट्या आरोपांवर मौन सोडले आहे. तर अंजली दमानिया यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment