अंजली दमानियांनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार:म्हणाल्या – बीड आपोआप बदनाम होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केले

अंजली दमानियांनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार:म्हणाल्या – बीड आपोआप बदनाम होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केले

सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी होत असल्याचा आरोप मंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता. या आरोपावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला. बीड आपोआप बदनाम होत नाही, तर तुम्ही भावा बहिणीने बदनाम केले, अशी तिखट टीका अंजली दमानिया यांनी केली. तुमच्या गुंडांची दहशत सामान्य जनतेला भोगावी लागते, असा घणाघातही त्यांनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला. मात्र, राज्यात आजही वातावरण चांगलेच तापलेले आहे. या हत्याकांडावरून राजकारण होत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. तर सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे केली होती. या टीकेवरून अंजली दमानिया यांनी उपरोक्त विधान करत पुन्हा एकदा मुंडे बंधूभगिनीला लक्ष्य केले आहे. काय म्हणाल्या अंजली दमानिया?
पंकजा मुंडे ताई तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. तुमच्या मतदार संघात झालेल्या इतक्या क्रूर हायतेबद्दल तुम्ही खरंतर रोज बोलायला हवे होते, त्या कुटुंबाच्या घरी जायला हवे होते, जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवे होते. पण तुम्ही यातील काहीच केले नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावा-बहिणीने तुमच्या दहशतीने बदनाम केले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच सुरेश धस पण त्यातलेच एक आहेत, असे म्हणत धस यांनाही सुनावले. तुमच्या गुंडाची दहशत जनतेला भोगावी लागते
तुम्ही म्हणता तुम्ही बीड मध्येच राहता आणि तुम्ही एक महिला देखील आहात, पण तुम्ही हे विसरता की, हे गुंड तुमचेच आहेत आणि तुम्हाला सुरक्षा आहे, सामान्य जनतेला नाही. तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते, असा टोला अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम होत आहे. त्यांनी राजकीय भूमिका न घेता हा विषय संवेदनशीलपणे समजून घेतला असता तर बीडची अशी बदनामी झाली नसती. आमच्या जिल्ह्यात स्वाभिमानी लोक आहेत. मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते. सर्वात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत. आम्ही काम करतो. आता सांगितली जात आहे तशी स्थिती असती तर आम्ही दरोडे टाकायला गेलो असतो ना? अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआयमधून माझ्याकडे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. हे ही वाचा… वाल्मीक कराडला कोण वाचवतंय?:व्हिडिओ कॉलवर हत्या पाहणारा आठवा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानिया यांचा सवाल संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आज 7 आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यात आली. पण त्यातून खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडला बाहेर ठेवण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी तपास यंत्रणांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत व्हिडिओ कॉलवर क्रूर हत्या पाहणारा 8 वा आरोपी बाहेर कसा? असा खडा सवाल उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment