अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यावर हजारे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. अखेर हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या सरकारवर विश्वास व्यक्त करून ‘असा काही निर्णय हे सरकार घेईल असे वाटत नाही. घेतलाच तर पुन्हा आंदोलन करू,’ असा इशाराही हजारे यांनी दिला आहे.

महविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा राज्यात मोठा गदारोळ झाला होता. भारतीय जनता पक्षाने याला कडाडून विरोध केला. महाराष्ट्राचे मद्यराष्ट करायचे आहे काय? असे तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ठणकावून विचारले होते. त्याच दरम्यान अण्णा हजारे यांनीही या निर्णयाला विरोध केला होता. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी हजारे यांची भेट घेतली. या निर्णयावर जनतेच्या हरकती व सूचना मागवायच्या व नंतरच अंतिम निर्णय घ्यायचा असा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार हरकती मागविण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना आल्या आहेत. मधल्या काळात सत्तांतर झाले. हा विषय मागेच पडला होता.

हा निर्णय पाया पुढे कळस रचणार, दसरा मेळाव्याचा निर्णय होताच शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

आता सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी हा विषय पुन्हा पुढे आणला आहे. या निर्णयावर लोकांकडून आलेल्या हरकती व सूचनांची मोजदाद करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचे हितच साधले जाईल, असे म्हटले. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला दारूबंदी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शविला. यावर हजारे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

शिंदे गटाने डाव टाकलाच होता, पण एक गेम फसला अन् फासा पलटला? लढाई ठाकरेंनी जिंकली!

आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, ‘मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे बरोबर नाही. पूर्वी हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी तो थांबला. मला शाश्वती आहे, आता राज्यात जे सरकार आले आहे, ते मॉल आणि तेथे दारू विकायला ठेवयचा विचार करणार नाही, असा मला विश्वास वाटतो. जर तसा निर्णय झालाच तर आम्हाला नाइलाजास्तव आमच्या मार्गाने जावे लागेल. पण अजून असा काही निर्णय आलेला नाही. आल्यानंतर पाहू. मात्र, ही आमची संस्कृती नाही,’ असेही हजारे यांनी ठणकावून सांगितले.

शिवाजी पार्कवर आव्वाज शिवसेनेचाच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी!

मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांगू, गप्प बस; राणेंचा आदित्य ठाकरेंना इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.