बदलापूर येथील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल:एसआयटीच्या माध्यमातून आरोपीची मानसिक तपासणी देखील करण्यात येणार
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदे या आरोपीने अत्याचार केल्याची बाब तपासातून समोर आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या माध्यमातून अक्षय शिंदे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बदलापूर येथील शाळेमध्ये घडलेल्या या संतप्त प्रकरणानंतर राज्यभरात आंदोलने करण्यात आली होती. बदलापूरमध्ये तर नऊ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले होते. या आरोपीला देखील पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते. मात्र आता या आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने आणखी एका चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची मानसिक तपासणी करण्यात येणार बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची मानसिक तपासणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यासाठी एसटायटीच्या माध्यमातून न्यायालयात अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. आरोपीची मानसिक तपासणी करण्याची परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर आरोपीची मानसिक तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितला आहे. शाळा सुरू करण्याचा प्रयत्न पालकांशी संवाद चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर बंद असलेली बदलापूर पूर्वेतील शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या आधी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पालकांशी संवाद साधून शाळेतील विद्यार्थी सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण शाळा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.