आणखी एक आला सांगत देवेंद्र फडणवीसांनी कपाळावर मारला हात:अजित पवार म्हणाले – तुम्ही काय हसताय? माझा माणूस पडला तिकडे

आणखी एक आला सांगत देवेंद्र फडणवीसांनी कपाळावर मारला हात:अजित पवार म्हणाले – तुम्ही काय हसताय? माझा माणूस पडला तिकडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने यश मिळाले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र पत्रकार परिषद झाल्यावर एक मजेदार किस्सा येथे घडला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महायुतीची पत्रकार परिषद झाल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे नेते उठले. तितक्यात देवेंद्र फडणवीस यांना शिवाजी पाटील विजयी झाल्याची बातमी समजते व ते एकनाथ शिंदे यांना सांगतात. अजून एक आमदार आला आहे निवडून, असे म्हणत देवेंद्र फडणवीस हसून कपाळावर हात मारतात. त्यावर काय सांगता? असे शिंदे म्हणतात. तेव्हा फडणवीस म्हणतात हो हो शिवाजी पाटील जिंकले आहेत. त्यावर दोघे हसत असताना अजित पवार म्हणतात, अरे काय तुम्ही दोघं हसताय, माझा माणूस पडला न तिकडे, असे म्हणत ते देखील मिश्किलपणे हसतात. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमुळे आम्ही जिंकलो आहोत. महाराष्ट्रात अभूतपूर्व निकाल लागला असा निकाल मी मागच्या तीस वर्षात पाहिलेला नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच आता आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे देखील फडणवीस व शिंदे म्हणाले. महायुतीची आता शपथविधी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर किंवा राजभवनात होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तम कामगिरी केली आहे. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर महायुतीमधील कोणता चेहरा पुढे येतो याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment