म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स बजावले. केजरीवाल यांना ‘ईडी’ने पाचव्यांदा समन्स पाठवले असून, त्यांना उद्या, शुक्रवारी (दोन फेब्रुवारी) चौकशीसाठी बोलावले आहे. केजरीवाल यांनी या वेळी पुन्हा ‘ईडी’ चौकशीकडे पाठ फिरवली, तर त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मद्यधोरण घोटाळा प्रकरणातच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि ‘आप’चे खासदार संजयसिंग तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना ‘ईडी’ने १७ जानेवारी, तीन जानेवारी, २१ डिसेंबर आणि दोन नोव्हेंबरला समन्स पाठवले होते; परंतु ते हजर झाले नाहीत. चौथ्या समन्सवर केजरीवाल यांनी, ‘भाजपला मला अटक करायची आहे, जेणेकरून मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही,’ असा आरोप केला होता.

पायात रिंग, पंखाखाली मेसेज; मुंबई पोलिसांकडून कबुतराची ८ महिन्यांनी मुक्तता, प्रकरण काय?

‘या चारही नोटिसा बेकायदा आणि अवैध आहेत. ‘ईडी’ जेव्हा जेव्हा अशा नोटीस पाठवते, तेव्हा न्यायालय त्या रद्द करते. ही नोटीस म्हणजे राजकीय सूडाच्या भावनेने केलेली कारवाई आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे; मात्र काहीही निष्पन्न झालेले नाही. हा घोटाळाच झालेला नाही,’ असा दावा केजरीवाल व ‘आप’ने केला होता. ‘भ्रष्ट नेते भाजपमध्ये दाखल होतात आणि त्यांच्यावरील खटले बंद होतात. आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही, आमचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही,’ असे ‘आप’ने म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटक होण्याच्या शक्यतेवर शरद पवार यांची भर शिबिरातून प्रतिक्रियाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *