पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम:धर्म-अंधश्रद्धेची गांजायुक्त चिलीम मारून काहीजण देश बिघडवताय- संजय राऊत
मोदी काळात विकास, आधुनिकता, विज्ञान यापेक्षा अंधश्रद्धा, धर्मांधता याला प्राधान्य मिळत आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, तर अंधश्रद्धा ही गांजाने भरलेली चिलीम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा वापर भाजपकडून होतो, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, तिरुपती मंदिरातील प्रसादावरून राजकारण सुरू झाले व त्यात भाजप पुरस्कृत ‘ढोंगीबाबा’ महामंडलेश्वरांनी भाग घेतला. कोणत्याही विषयाचे राजकारण करायचे व शेवटी त्यास धर्माची फोडणी द्यायची, हे तिरुपती मंदिरातील लाडवाच्या प्रसादावरूनही घडले. चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी हे आरोप केले. मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
राऊत नेमके काय म्हणाले? संजय राऊत म्हणाले की, तिरुपती मंदिरावर संपूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे नियंत्रण असते. 24 जणांचे हे विश्वस्त मंडळ. त्यातील अनेकजण पंतप्रधान कार्यालयातून नेमलेले सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ‘खास’ अमोल काळे (त्यांचे अलिकडेच निधन झाले), शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, गुजरातचे डा. केतन देसाई असे तज्ञ राज्य सरकारचे, पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून त्या मंदिर बोर्डावर आहेत. मंदिराचे वैशिष्टय़ व काटेकोरपणा असा की, शुद्धतेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुपाचा किंवा अन्य पदार्थांचा ट्रक मंदिरात प्रवेश करू शकत नाही व असे ट्रक अनेकदा परत गेले. हे एवढे कडक धोरण असताना लाडवाच्या तुपात चरबी आहे, असा आरोप करून गोंधळ उडवून द्यायचे कारण काय? कारण इतकेच की, विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाचे व्यापारी हितसंबंध ‘लाडू प्रसाद’ व्यवहारात गुंतलेले दिसतात. तिरुपती मंदिरात कोटय़वधी रुपयांचे तूप विकत घेतले जाते. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश नायडू यांनी स्वतःची हेरिटेज फूडस् ही कंपनी स्थापन केली. जुलै महिन्यात चिरंजीव नारा यांनी तिरुपती देवस्थानकडे हेरिटेज फूडस्द्वारा आपल्या कंपनीचे तूप खरेदी करण्याचे विनंतीपत्र पाठवले. त्यावर निर्णय झाला नाही. टेंडर व शुद्धतेच्या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तूप खरेदी करता येत नाही, असे नारांना कळविण्यात आले. लगेच त्याच जुलै महिन्यात तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचा अहवाल गुजरातच्या ‘लॅब’कडून चंद्राबाबूंकडे येतो. हा निव्वळ योगायोग कसा समजायचा? नक्की काय घडले? संजय राऊत म्हणाले की, लाडू-प्रसाद प्रकरणात तिरुपती बालाजी मंदिराचे पावित्र्य भंग झाले, असा शंखनाद भाजपच्या गोटातून सुरू झाला. त्यामागे राजकीय कारणदेखील आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचे चार खासदार निवडून आले आहेत. नाइलाजाने ते मोदी सरकारला पाठिंबा देत आहेत. जगन मोहन यांच्यावर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. त्या भीतीमुळे जगन मोहन मोदी सरकारसोबत आहेत. चंद्राबाबूंचा पक्षही मोदींसोबत असल्याने राज्याच्या राजकारणात जगन मोहन यांची अडचण झाली आहे. ही अडचण संपवण्यासाठी जगन मोहन ‘इंडिया’ आघाडीचा हात पकडू शकतात. त्यामुळे अल्पमतातल्या मोदी सरकारचे बळ कमी होईल. त्यामुळे हिंदुत्व व श्रद्धेच्या नावावर जगन मोहन यांना डागाळून ठेवा हे धोरण आहे. राजकीय फायद्या-तोटय़ाच्या भांडणात तिरुपती बालाजींच्या लाडवाचा प्रसाद बदनाम झाला. प्राण्यांच्या चरबीपेक्षा धर्माचे, श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी समाजाला घातक आहे! सध्या तीच चरबी वाढलेली दिसते, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.