मुंबई: मंगेशकर घराण्याचा वारसा मोठ्या दिमाखात जपणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale Video) यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान त्यांची नात जनाई भोसलेही (Asha Bhosale Granddaughter Janai Bhosale) सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून तिनेही तिची अशी फॅन फॉलोइंग कमावली आहे. अलिकडेच आजी-नातीची ही जोडी मुंबईत एकत्र दिसली होती, त्यानंतर पुन्हा एकदा जनाईची चर्चा सुरू झाली. या दोघी मुंबईतील एका जपानी रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाल्या. त्याचे काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पॅपाराझींनी शेअर केले आहेत. वांद्रे याठिकाणच्या ‘मिझू’ रेस्टॉरंटबाहेर या दोघींना स्पॉट करण्यात आले.

हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास

त्यावेळी एकत्र चालत असताना जनाईने आशा यांचा हातही पकडला होता. आजी-नातीचं क्युट बाँडिंग यावेळी पाहायला मिळालं. त्यांनी फोटोसाठी पोजही दिल्या. यावेळी जनाईचा अंदाज चाहत्यांच्या नजरेतून सुटणारा नव्हता. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देईल अशा ग्लॅमरस अंदाजात ती दिसली.


इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही जनाईने आशा यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला. यावर जनाईने असं कॅप्शन दिलं होतं की, ‘बेस्ट डिनर डेट’. तिने आशा भोसलेंना यामध्ये टॅगही केलेले आणि त्यासोबत तिने अनेक फ्लॉवर आणि रेड हार्ट इमोजीही पोस्ट केल्या होत्या.

Asha Bhosale Dinner Date With Granddaughter

हे वाचा-प्रिया-उमेशचा रोमँटिक किस; एकेकाळी बोल्ड सीन करतानाही गोंधळलेली अभिनेत्री

सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे जनाई

जनाईलाही तिच्या आजीप्रमाणे संगीत विश्वात करिअर करायचे आहे. तिला गायनाची विशेष आवड आहे. अनेकदा तिने सोशल मीडियावर आजीसोबतचे व्हिडिओ शेअर केलेत. तिने आशा भोसले यांच्यासोबत परफॉर्मही केलं आहे. आशा भोसलेंनी काहीच दिवसांपूर्वी ०८ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळीही जनाईने त्यांच्यासोबतचा एका परफॉर्मन्सदरम्यानचा व्हिडिओ शेअर केला होता. तिने त्यांच्यासाठी खास कविताही कॅप्शनमध्ये शेअर केलेली. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासोबतही तिचं खास बाँडिंग होतं.


जनाई २० वर्षांची असून तिचे सोशल मीडियावर ४४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गाण्याशिवाय तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटोही चाहत्यांना आवडतात. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.