मुंबई– ‘दिस जातील दिस येतील’, ‘फुलले रे क्षण माझे’, ‘स्वप्नात साजना येशील का’ या आणि यांसारख्या अनेक जबरदस्त व सदाबहार गाण्यांना आपला आवाज देणाऱ्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका आशा भोसले आज आपला ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आशा लहानपणापासूनच वेगळ्या स्वभावाच्या आहेत. त्यांना जे आवडते तेच त्या करतात. त्यांची बहीण म्हणजेच गानकोकिळा लता मंगेशकर त्यांच्या गायनासाठी तसेच त्यांच्या मृदू स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. दोघेही एकमेकांपासून दूर राहायच्या, पण दोघींमध्ये खूप प्रेम होते.

लता दिदींसाठी आम्हीही प्रार्थना करतोय; आशा भोसलेंची प्रतिक्रिया

दोन्ही बहिणींची कथाही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. दोघींनीही आपल्‍या करिअरमध्‍ये खूप काही मिळवले, पण दोन्ही बहिणींना लहानपणी खूप त्रास सहन करावा लागला होता. लतादीदींनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली, कारण त्यांच्यावरील त्यांचे वडीलांचे छप्पर हरपले होते. शिवाय त्या त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होत्या.

आशा भोसले यांना नियमांचे बंधन आवडत नसे

दुसरीकडे, आशा भोसलेही जेव्हा मोठ्या झाल्या, तेव्हा त्या आपल्याला घराची जबाबदारी घेण्यात हातभार लावतील असे लतादीदींना वाटले. पण आशा लहानपणापासूनच लहरी होत्या. त्यांना नियमांचे बंधन आवडत नव्हते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ३१ वर्षीय गणपतराव भोंसले यांच्याशी लग्न करून आशा यांनी लतादीदींना आश्चर्यचकित केले होते.

नव्वदीच्या झाल्या गानसम्राज्ञी,आशा भोसले यांनी गायनासोबतच अभिनयातही दाखवलेली जादू
यावरूनच दोन बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाला होता

गणपतराव भोसले हे लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. लतादीदींनी त्यांच्या नात्याला कधीही मान्यता दिली नाही आणि यामुळे दोन बहिणींमध्ये अंतर आणि दुरावा निर्माण झाला. अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बोलणेही झाले नव्हते असे म्हटले जाते. आशा भोसले यांनी कुटुंबाशी सर्व संबंध तोडले होते.

त्या दिग्दर्शकामुळं माझं मुंबईत घर झालं,तो माणूसच वेगळा…मित्राबद्दल बोलताना भावुक झाले मिलिंद गवळी
आशा आणि गणपतरावांचे नाते टिकू शकले नाही

लग्नानंतर दोघांनाही तीन मुलं झाली, पण दोघांच्या लग्नाचा शेवट खूप वेदनादायी झाला. लता मंगेशकर यांनी त्यांच्याच एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते की, हे नाते आशासाठी योग्य नाही मला ठाऊक होतं. आशा भोसले यांनी १९८० मध्ये आरडी बर्मन यांच्याशी लग्न केले, परंतु हे नातेही चांगले चालले नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *