मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बिनविरोध निवड करण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विरोध दर्शवला आहे. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हा प्रस्ताव मांडला होता, त्याला बैठकीत उपस्थित सर्वांनी पाठिंबा दिला, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नसल्याची माहिती आहे.

काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे एक आहेत. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, ही या नेत्यांची प्रमुख मागणी आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाबाबत (Congress President Election) सस्पेन्स अजूनही कायम आहे. २४ सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, मात्र अध्यक्षपदाबाबत पक्षात अद्याप एकमत झाले नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाचीही चर्चा जोरात सुरु असून ते निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गेहलोत राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत.

हेही पाहा : गुलाबराव पाटील काय हिंदुत्ववादी होणार, फायद्यासाठी शिंदेंनाच ‘आजा’ बनवलं

काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीबाबतची अधिसूचना २२ सप्टेंबर रोजी जारी केली जाणार आहे. २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

मुंबईत काँग्रेसच्या ५५३ प्रतिनिधींच्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. या दोन राज्यात काँग्रेसचे स्वबळावर सरकार आहे.

हेही वाचा : विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंना गिफ्ट, ग्रामपंचायत निवडणुकीत मोठं यश, मनसैनिकांची भेटीस गर्दीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.