मुंबई : भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. या विश्वचषकाच्या संघात आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे. विश्वचषकाचा संघ म्हटला की अश्विन हा संघात असतोच, हे पाहायला मिळाले आहे. अश्विन हा ट्वेन्टी-२० संघात काही दिवसांपूर्वी नव्हता, पण तो थेट विश्वचषक असला की संघात कसा काय येतो, याचे कारण आता समोर आले आहे.

युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या निवडीवर चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या वर्षी अश्विनची २६ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती, पण त्याला केवळ पाच सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. आतापर्यंत ज्याला जास्त खेळण्याची संधीच दिली नाही त्या ३५ वर्षांच्या अश्विनपेक्षा २२ वर्षांच्या रवी बिश्नोईला संघात स्थान का देण्यात आले नाही, असा प्रश्न आता चाहते विचारु लागले आहेत.

अश्विनने आतापर्यंत भारतासाठी ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रवी बिश्नोईला फक्त १० सामन्यांचा अनुभव आहे. अश्विनने जून २०१० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळला होता. अश्विनने २०१२, २०१४, २०१६ आणि २०२१ टी-२० विश्वचषकही खेळले आहेत. याचा अर्थ त्याला जगातील प्रत्येक खेळपट्टीवर वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. दबावाच्या परिस्थितीत खेळ कसा करायचा हे त्याला माहीत आहे. अश्विनचा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांमध्ये चांगलाच उपयोग होऊ शकतो. कारण अश्विन हा विकेट तर मिळवतोच, पण त्याचबरोबर तो प्रतिस्पर्धी संघांच्या धावांवर लगाम लावत असतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धावांवर लगाम लावणेही महत्वाचे असते. त्यामुळे अश्विनचा अनुभव हा जगातील कोणत्याही खेळपट्टीवर कामाला येऊ शकतो. त्यामुळे अनुभव कमी असलेल्या खेळाडूपेक्षा अश्विन हा कधीही संघाच्या कामाला येऊ शकतो.

अश्विन आणि जडेजा हे दोन्ही असे खेळाडू खेळाडू आहेत की, ते कोणत्याही क्षणी चांगल्या फॉर्मात येऊ शकतात. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी कशी करायची, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. या विश्वचषकापूर्वी रवींद्र जडेजा जडेजाला दुखापत झाली असून त्याची या विश्वचषकासाठी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे संघात एक तरी अनुभवी फिरकी गोलंदाज असावा यासाठी अश्विनला संघात स्थान देण्यात आले असावे, असे म्हटले जात आहे. पण अश्विनला आता ऑस्ट्रेलियातील विश्वचषकातील किती सामने खेळण्याची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.