कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. पण पावसामुळे जर रविवारी फायनलचा सामना झाली नाही तर कोण विजेता ठरू शकतो, याचे नियम आता समोर आले आहेत. कारण सुपर ४ फेरी संपल्यावर भारतीय संघ अव्वल स्थानावर होता. त्यामुळे जर फायनल रद्द झाली तर काय होईल, याची उत्सुकता सर्वांना असेल.

आतापर्यंत गुणतालिकेत जर आपण पाहिले तर भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांना सुपर ४ मध्ये पराभूत केले होते. पण त्यांना बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशला पराभूत केले होते. त्यानंतर श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. फायनलच्या सामन्यापूर्वी भारत हा गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, श्रीलंकेचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे. पण जर पावसामुळे रविवारी अंतिम फेरीचा सामना झाला नाही तर काय होणार, यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत.

रविवारी पावसामुळे जर दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता ठरवण्यात येईल. पण जर पावसामुळे दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ झाला नाही, तर अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यानुसार हा सामना राखव दिवशी म्हणजेच सोमवारी खेळवला जाऊ शकतो. पण जर सोमवारीही दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ झाला नाही तर सामन्याचा निकाल लागणार नाही. या परिस्थिती आशिया चषक हा भारत आणि श्रीलंका या दोन्ही फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांना विभागून देण्यात येईल. त्यानुसार भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संयुक्त विजेते ठरतील. त्यामुळे जर पावसामुळे निकाल लागला नाही तर भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ संयुक्तपणे जेतेपदाचे हकदार असतील.

नेपाळच्या क्रिकेटपटूंचा भारतीय टीमनं केला गौरव

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. त्यामुळे आता या अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारून जेतेपद पटकावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *