नेहा गद्रे

नेहा गद्रे

नेहा गद्रे हे मराठी सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय असलेलं नाव आहे. नेहा अजूनही प्रेक्षकांची आवडती आहे. तिने आपल्या साध्या भोळ्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली होती. ‘मन उधाण वाऱ्याचे’ , ‘अजूनही चांदरात आहे’, ‘गडबड झाली’, ‘मोकळा श्वास’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं. आजही तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोवर्स आहेत. नेहादेखील लग्न करून ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली आहे. तिने नवीन क्षेत्रात करिअर सुरू केलं आहे.

चैत्राली गोखले

चैत्राली गोखले

अभिनय क्षेत्र सोडून परदेशात स्थायिक झालेली चौथी अभिनेत्री आहे चैत्राली गोखले. आभाळमाया, इंद्रधनुष्य अशा मालिकांमधून चैत्रालीने अभिनय केला होता. मात्र या मोजक्या प्रोजेक्टनंतर चैत्राली लग्न करून टेक्सासला स्थायिक झाली. अर्थात अभिनय क्षेत्र तिने सोडलेले नसले तरी स्थानिक नाटकांमधून ती आपली अभिनयाची हौस पूर्ण करत आहे.

मृणाल दुसानीस

मृणाल दुसानीस

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानीस आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ‘तू तिथे मी’ ,’असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही प्रचंड गाजल्या. मात्र त्यानंतर तिने लग्न केलं आणि पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. तिला नुरवी नावाची गोड मुलगीही आहे.

सुजाता जोशी

सुजाता जोशी

‘एका लग्नाची गोष्ट’, ‘बॅरिस्टर’, ‘मनोमनी’ यांसारख्या नाटकातून तर ‘साडे माडे तीन’, ‘मध्यमवर्ग’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सुजाता जोशी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘असंभव’ या मालिकेतही ती झळकली होती. सुजाताने २०२४साली लग्न केलं आणि नवऱ्यासोबत परदेशी स्थायिक झाली. मात्र तिने घेतलेल्या वकिलीच्या डिग्रीचा तिने उपयोग केला आणि तिथे सॉलिसिटर म्हणून जॉब केला. तिला आता एक गोंडस मुलगीदेखील आहे.

उमा पेंढारकर

उमा पेंढारकर

भालजी पेंढारकर यांची नातसून असलेली अभिनेत्री उमा पेंढारकर हिने ‘अग्गबाई सुनबाई’, ‘योगयोगेश्वर जयशंकर’ अशा मालिकांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संगीत नाटकातून काम करत असताना तिला स्वामिनी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. अभिनय क्षेत्र सोडून ती आता स्वतःचे युट्युब चॅनल चालवत आहे. ती निरनिराळ्या मेकअप टिप्स आणि तणाव कमी करण्याच्या पद्धती सांगताना दिसते. ती पतीसोबत न्यूझीलंडला स्थायिक झाली आहे. उमाने तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

वेगळी वाट

 वेगळी वाट

या अभिनेत्रींनी लोकप्रियतेच्या शिखरावर असतानादेखील आपल्या करिअरचा त्याग करून वेगळी वाट निवडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *