[ad_1]

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. इंडियाना येथील पर्ड्यु विद्यापीठात डॉक्टरेक्टचे शिक्षण घेणाऱ्या एका भारतीयाचा मृतदेह आढळला असून अन्य एका आयटी विद्यार्थ्यावर त्याच्या शिकागोतील घराजवळ हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याची ही या वर्षीची सहावी घटना आहे.

मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेणारा २३ वर्षीय समीर कामथ हा वॅरेन कौंटी येथे सोमवारी मृतावस्थेत आढळल्याचे त्याच्या विभागप्रमुखांनी मंगळवारी जाहीर केले. त्याने अॅमहेर्स्टच्या मॅसच्युसेट्स विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर सन २०२१मध्ये पर्ड्यु विद्यापीठात प्रवेश घेतला होता. सन २०२५मध्ये तो डॉक्टरेट झाला असता.

हल्ल्याची दुसरी घटना रविवारी शिकागोमध्ये घडली. तेथे आयटीचे शिक्षण घेणाऱ्या सैयद मझहिर अली याचा अज्ञातांनी पाठलाग करून त्याला त्याच्या घराजवळच अमानुष मारहाण केली. सोशल मीडियावर या हल्ल्यासंदर्भातील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात अली याचे नाक आणि तोंड रक्तबंबाळ झाल्याचे आणि त्याच्या कपड्यावरही रक्ताचे डाग दिसत आहेत. त्याच अवस्थेत तो संपूर्ण घटना सांगत आहे.

अली सहा महिन्यांपूर्वीच हैदराबादहून अमेरिकेतील इंडियाना वेस्लियान विद्यापीठात माहिती तंत्रज्ञानात मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी आला आहे. ‘अमेरिका ही माझी स्वप्ननगरी आहे. मी येथे माझ्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आणि माझे मास्टर्स शिक्षण घेण्यासाठी आलो आहे. मात्र या घटनेमुळे मला धक्का बसला आहे,’ अशी प्रतिक्रिया अलीने दिली.

अली हा रात्री त्याच्या घराच्या दिशेने जात असताना तिघा व्यक्तींनी त्याचा पाठलाग गेला आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका हल्लेखोराने त्याच्या दिशेने बंदूक रोखल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

या घटनेनंतर अली याच्या पत्नीने तीन अल्पवयीन मुलांसह अमेरिकेत जाण्यासाठी साह्य करण्याची विनंती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासानेही आपण सैयद आणि त्याची भारतातील पत्नी सईदा यांच्या संपर्कात असून त्यांना शक्य ती सर्व मदत देण्याची ग्वाही दिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *