वाचा: Budget Phones: 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार सुरुय ? पाहा स्वस्त 5G फोन्सची ही लिस्ट, मिळतेय १०,००० रुपयांपर्यंतची डील
किती पैसे मोजावे लागतील ?
हे पोर्टेबल साउंड बार Flipkart तसेच Mivi वेबसाइटवर उपलब्ध आहेत. जिथे S16 ची विशेष किंमत १२९९ रुपये आहे. तर दुसरीकडे, S24 खरेदी करण्यासाठी तुम्हाला १७९९ रुपये खर्च करावे लागतील. दोन्ही साउंड बार या किमतीत लॉन्चच्या दिवशीच खरेदी करता येतील. ४ ऑगस्टपासून साउंड बार S16 ची किंमत १४९९ रुपये आणि S24 ची किंमत १९९९ रुपये असेल.
साऊंडबारमध्ये काय आहे खास?
Mivi च्या या दोन्ही साऊंड बारमध्ये स्टुडिओ क्वालिटी बास फीचरचा अनुभव ग्राहकांना घेता येईल . याद्वारे युजर्सना सिनेमाच्या आवाजाच्या गुणवत्तेचा उत्तम अनुभव मिळू शकतो. या साऊंड बारची कनेक्टिव्हिटी देखील खूप चांगली आहे आणि हे साउंड बार AUX, Bluetooth 5.1, TF/USB आणि मायक्रो SD कार्ड सारख्या मल्टी-चॅनल इनपुटला देखील सपोर्ट करतात. यामुळे युजर्स त्यांच्या आवडत्या गाण्याचा कधीही कुठेही आनंद घेऊ शकतात.