औरंगाबाद : पती पासून विभक्त राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेवर सतत दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज औधोगिक वसाहतीमधून समोर आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर तसलीम शेख (रा. एम.आय.डी.सी. वाळूज परिसर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, २९ वर्षीय पीडित महिला पती पासून विभक्त राहते. उदरनिर्वाहसाठी ती खाजगी कंपनीत काम करते. २०२० मध्ये पीडितेची ओळख आरोपी तन्वीर सोबत झाली होती. घरात पैशाची कमतरता भासत असल्याने पीडितेने आरोपीकडून ५० हजार रुपये हात उसने म्हणून घेतले होते. पैशांच्या व्यवहारातून आरोपीचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. पीडिता घरी असताना आरोपीने बळजबरीने विवाहितेसोबत शरीरिक संबंध बनविले.

Bacchu kadu : गावे अनुदानातून वगळले, पन्नास खोके, एकदम ओके; बच्चू कडूंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची घोषणाबाजी
दरम्यान, “याबाबत कुणाला काही सांगू नको, अन्यथा जीवे मारीन”, अशी धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. “तुला दिलेले उसने पैसे तू मला परत देऊ नको तू माझ्यासोबत राहा”, असं म्हणत आरोपीने तब्बल २ वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण केले. मात्र, तन्वीरचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडिता वैतागली होती. अखेर पीडितेने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादिवरून एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आधी राठोडांसाठी नडले, आता ठाकरेंच्या साथीनं राठोडांनाच भिडणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.