मुंबई: विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय क्रिकेट संघाला दिलासा मिळाला आहे. आता त्याच्याकडून २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या घरच्या टी-२० मालिकेत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची जुनी भूमिका अपेक्षित आहे. विराट ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतो. या मालिकेतही कोहलीचा हा फॉर्म दिसला तर टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी नक्कीच एक चांगली बातमी ठरेल.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची करतो धुलाई

विराट कोहली दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना डिसेंबर २०२० मध्ये सिडनी येथे खेळला होता, त्याने ८५ धावा केल्या होत्या. कांगारूंविरुद्धच्या १९ सामन्यांमध्ये ५९.८३ च्या सरासरीने आणि १४६.२३ च्या स्ट्राईक रेटने ७१८ धावा केल्या आहेत, ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या याच सामन्यात त्याने चार अर्धशतकांच्या मदतीने ५८९ धावा केल्या.

हेही वाचा –

विराटची खेळी

रन मशीन विराटची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार तळपते. २०१२ ते २०२० या ८ वर्षांच्या कालावधीत असा एकही सामना नाही ज्यात विराटने धावा केल्या नाहीत. ७ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत विराटने तीन सामन्यांत १९९ च्या सरासरीने अर्धशतकांसह १९९ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, तो रोहित शर्माशीही स्पर्धा असेल. या दोन स्टार फलंदाजांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लढाई सुरू आहे. रोहित सध्या टी-२० मध्ये सर्वाधिक ३६२० धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर विराट त्याच्या अगदी खाली असून त्याने ३५८४ धावा केल्या.

हेही वाचा –

आशिया कपमध्ये फॉर्म परतला

कोहलीने या स्पर्धेत आपला जुना फॉर्म परत मिळवला आहे. ३५, ५९*, ६०, ०, १२२ हे आकडे आशिया कपमधील कोहलीची उत्कृष्ट खेळी आहे. एकूण २७६ धावा या स्पर्धेत त्याने केल्या. १०२० दिवसांनंतर त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. मोहालीत होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात किंग कोहलीला आपला हाच फॉर्म कायम ठेवायचा आहे.

विराट कोहलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.