अनघाने गेल्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये एक पोस्ट करत आपण इंडस्ट्री सोडून भक्तिमार्गावर चालणार असल्याचं सांगितलं होतं. ती ‘अनुपमा’ या मालिकेत नंदिनीच्या भूमिकेत होती. २३ व्या वर्षी निर्णय घेत तिने आपण कृष्णभक्ती करणार असल्याचं म्हटलं. अनघाच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. शुटिंगमुळे भक्तीसाठी वेळ मिळत नसल्याचं तिने सांगितलं. आता ती पूर्णवेळ कृष्णभक्तीत मग्न असते. भक्तीचा मार्ग तुम्हाला शांतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो असं तिचं म्हणणं आहे. मात्र तिने अभिनय सोडला असला तरी तिने अजूनही संन्यास घेतलेला नाही. जी व्यक्ती तिच्यासारखी कृष्णभक्त असेल त्याच्याशी ती लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं.
अनघा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती गोवर्धन इकोव्हिलेज या संस्थेसाठी काम करते. जी कृष्णभक्तांसाठीच बनली आहे. ती सध्या वृंदावन येथे असते. मात्र तिने तिच्या कुटुंबाला अंतर दिलेलं नाही.