मुंबई : जंगली पिक्चर्सचा डाॅक्टर जी सिनेमाची प्रतीक्षा अनेकांना आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. डाॅक्टर जी सिनेमात आयुष्यमान खुराना, रकुलप्रीत सिंह आणि शेफाली शाहच्या प्रमुख भूमिका आहेत. आयुष्मान पुरुष गायनॅकोलाॅजिस्ट आहे. अभिनेता प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका करून चाहत्यांना धक्काच देत असतो.

Doctor G ट्रेलरमध्ये स्त्रिया पुरुष गायनॅकोलाॅजिस्टकडे यायला तयार नसतात, असं दाखवलं आहे. Ayushmann Khurrana डॉ. उदय गुप्ता नावाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. उदयला ऑर्थोपेडिक व्हायचं आहे. पण त्याला गायनॅकचा अभ्यास करायला भाग पाडलं जातं. महिला पुरुष गायनॅकोलाॅजिस्टकडे येत नाहीत. उदय गुप्ताला खूप संघर्ष करावा लागतो.

बुसानमध्ये कपिल शर्मा करणार धमाका, ‘ज्विगाटो’चा ट्रेलर पाहिलात का?

डाॅक्टर जी सिनेमाची कथा
आयुष्मानला गायनॅक नको असतं. त्याला ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये यायचंय. पण असं होत नाही. शेफाली शाह त्याची प्रोफेसर आहे. ती त्याला म्हणते, पुरुष, स्त्री असं काही नसतं. डाॅक्टर हा डाॅक्टर असतो. तू तुझा मेल टच काढून रुग्णावर उपचार कर. उदय गुप्ताला हाच प्रश्न पडलाय की मेल टच काय आहे आणि तो कसा काढून टाकायचा?

फॅन्सना आवडलीय आयुष्मानची भूमिका
डाॅक्टर जी सिनेमा १४ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अनुभूती कश्यपनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. फॅन्स आयुष्मानच्या या अवतारावर खूश आहेत. यु ट्यूबवर चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता नेहमीच वेगळ्या भूमिका करतो. तेही सहजतेनं. म्हणूनच त्यानं आपला ठसा उमटवला आहे.

जोशात साजरा झाला अमेय खोपकरांचा वाढदिवस, पाहा कोण गेलेलं पार्टीत

आयुष्मान खुरानाने विविध विषयांची हाताळणी करणारे चित्रपट निवडून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. सुरुवातीपासून त्याने अशाच चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्याचा विषय काहीतरी हटके आहे. मग समलैंगिक रिलेशनशिप असो किंवा पुरुषांच्या सेक्सविषयीच्या समस्या… अशा अनोख्या विषयांवरील चित्रपटात आयुष्मान दिसला. त्याच्या ‘अंधाधून’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर चांगली कमाई केलीच, शिवाय समीक्षकांचीही वाहवा मिळाली.

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.