कोलकाता : पाकिस्तानचे या वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. पण आपला अखेरचा सामना खेळताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताबाबत आता मोठे वक्तव्य केले आहे.इंग्लंडने टॉस जिंकला आणि तिथेच पाकिस्तानचे सेमी फायनलमधील भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे. कारण आता एक अशक्यप्राय समीकरणाचा पाठलाग त्यांना करावा लागणार आहे, जे काही शक्य नाही. या सामन्यानंतर बाबरचे कर्णधारपद जाणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानचे नेतृत्व करताना आपल्या अखेरच्या सामन्यात बाबरने भारताबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.बाबर म्हणाला की, ” या वर्ल्ड कपमध्ये आमच्याकडून चांगली कामगिरी होऊ शकली नाही. या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी सज्ज झालो होते. चांगली कामगिरी म्हणजे फक्त ५० किंवा १०० धावा करणे होत नाही, तर संघाला विजय मिळवून देणे हे सर्वात महत्वाचे असते. पण ते माझ्याकडून घडले नाही. जश परिस्थिती माझ्यासमोर आली त्यानुसार मी या वर्ल्ड कपमध्ये खेळलो. कधी जलदगतीने तर कधी संथपणे मी फलंदाजी केली. पण सरतेशेवटी संघाला त्याचा जास्त फायदा झाला नाही. आमच्या संघातील खेळाडू पहिल्यांदाच भारतात आले होते. त्यामुळे नेमकं कसं वागायचं हे आम्हाला माहिती नव्हते. पण भारतामध्ये आल्यावर आम्हाला चांगला पाहुणचार मिळाला. आम्हाला इथे आल्यावर भरपूर प्रेम मिळाले. फक्त मलाच माही तर संपूर्ण आमच्या संघाला भारतामध्ये चांगले प्रेम मिळाले. आम्ही या गोष्टीचा कधीही विचार केला नव्हता. पण भारतात आमचे चांगले आदरातिथ्य झाले. भारतात आल्यावर आम्ही परिस्थितीनुसार योजना आखल्या होत्या, पण त्यामध्ये आम्हाला यश मिळाले नाही, ही गोष्ट खरी आहे.”पाकिस्तानचा हा अखेरचा सामना असेल. पण पाकिस्तानचा संघ जेव्हापासून भारतामध्ये आला तेव्हापासून त्यांना चांगली वागणूक तर दिलीच, पण त्यांचा चांगला पाहुणचारही यावेळी करण्यात आला. या सर्व गोष्टीमुळए फक्त कर्णधार बाबर नाही तर संपूर्ण पाकिस्तानचा संघ भारावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *