बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचे प्रकरण:आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तीन एफआयआर एकत्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनुस्मृतीमधील श्लोकाचा समावेश प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करताना आव्हाड यांनी हे कृत्य केले होते. त्यानंतर आमदार आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलने झाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 153, 153A, 295, 188 नुसार 3 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 2 गुन्हे हे रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस स्टेशनमध्ये आणि एक पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांना एकत्र करण्याची मागणी आव्हाड यांच्या वतीने करण्यात आली होती. नेमके प्रकरण काय? शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे संतप्त झालेले शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, हे करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टरही फाडले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध शिंदेसेनेने नाशिक, भाजपने पुण्यात येथे निदर्शने केली होती. आव्हाडांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशी मागणीही अजित पवार गटाने केली होती. तर आव्हाडांनीही अनवधानाने फोटो फाडला गेला, असे सांगत माफी मागितली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली. त्याच साठी आव्हाड यांनी 28 मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आव्हाड यांनी त्याची पुनरावृत्ती करत हे आंदोलन केले होते.
याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या अनेक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स (एफआयआर) एकत्र करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नोटीस बजावली. मनुस्मृतीच्या वादग्रस्त लेखनाचा प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आव्हाड यांनी हे आंदोलन केले होते. दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश या संदर्भात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वकील विनोद उत्तेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या आपल्या याचिकेत, आमदार आव्हाड यांनी रायगड आणि पुणे जिल्ह्यात दाखल केलेल्या तीन एफआयआर एकत्र करण्याची विनंती न्यायपीठाला केली आहे. याचिकेनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल आहेत तर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 153, 153A, 295A आणि 188 सोबत मुंबई पोलिस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकळत आणि चुकून डॉ. आंबेडकरांचा फोटो फाडला गेला
आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या “वादग्रस्त” लेखनाचा समावेश करण्याच्या राज्याच्या निर्णयाची माहिती मिळाली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, या लिखाणांवर भारतातील प्रमुख नेत्यांनी आधीच टीका केली आहे. याचिकेत निदर्शनास आणून दिले की, समाजाच्या विविध स्तरातून टीका झाल्यानंतर, राज्याने स्पष्ट केले की, ते अभ्यासक्रमात वादग्रस्त लेखन समाविष्ट करण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर पुढे जाणार नाहीत. याच अनुषंगाने आव्हाड यांनी 29 मे 2024 रोजी रायगडमधील महाड येथील चवदार तलावाजवळ आंदोलन केले होते. तसेच निषेध करताना वादग्रस्त लिखाण फाडले आणि त्यासोबतच नकळत आणि चुकून डॉ. आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. याचिकाकर्त्याचा असा विश्वास होता की तो फाडत असलेली कागदपत्रेच वादग्रस्त लिखाण आहेत. हेतुपुरस्सर समाजातील शांतता आणि सलोखा बिघडवायचा त्या मागचा हेतू नव्हता.