19 जून २०२२ रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येक मुलीसाठी आणि बाबासाठी खास असतो. कारण हे नातं जगातील अतिशय सुंदर नातं आहे. मुलगी आणि वडिल हे नातं अनोखं असतं. या नात्यातील प्रेम, लाड, राग, दुःख सगळ्याचीच सीमा वेगळी असते. एक मुलगी तिच्या बाबाची अगदी जवळची व्यक्ती असते. पण वेळप्रसंगी ती कधी बाबाची आई होते तर कधी अगदी आजी देखील. मुलगी कायमच आपल्या वडिलांसोबत एक स्पेशल बाँड शेअर करत असते. हीच मुलगी अगदी तिच्या लग्नानंतरही बाबासाठी जगत असते.

मुलगी लग्नानंतरही आपल्या जवळच्या खास जोडीदारामध्ये आपला बाबा शोधत असते. त्यामुळे हे नांत कायमच खास असतं. सोशल मीडियावर आपण बाबा आणि लेकीचे अनेक कोट वाचले असतात. एक मुलगी कायमच तिच्या बाबासाठी ‘गोड परी’ असते तर लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच ‘सुपर हिरो’ असतो. त्यामुळे अशा बाप-लेकीच्या नात्याला करूया आणखी खास. १५ मुलींची नावे जी वडिलांच्या नावावरून ठेवता येतील. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​बाप आणि लेकीचं खास नातं अनुभवा

नयन – नयना : वडिलांच नाव जर नयन असेल तर तुम्ही नयना असं मुलीचं नाव ठेवू शकता. नयना नावाचा अर्थ सुंदर डोळे, निरागस. या नावाच्या मुलींकरता १ अंक हा शुभांक आहे. तर या नावाच्या मुलींकरता पिवळा, भगवा आणि गोल्ड असा रंग खास असतो.

आनंद – आनंदी : आनंद आणि आनंदी एका उत्साहाच प्रतिक, अशीच ही दोन नावं. आनंदाचा झरा अशाच या नावाची व्यक्तिमत्व असतात. या नावाच्या मुलींसाठी ७ हा अंक शुभांक आहे. हिरवा हा या नावाच्या मुलींसाठी शुभ रंग आहे.

विठ्ठल – मीरा : जर बाबाचं नाव विठ्ठल असेल तर तुम्ही मुलीचं नाव मीरा ठेऊ शकता. कृष्णावर निवांत प्रेम करणारी मीरा. मीरा या नावाच्या मुलीकरता ५ हा शुभांक आहे. तर सफेद आणि ग्रे रंग यांच्यासाठी शुभ आहे.

(वाचा – Breastfeeding With Flat Nipples : फ्लॅट निप्पल असलेल्या महिलांनी ब्रेस्ट फिडिंग करताना कोणती काळजी घ्यावी))

बाबाच्या नावावरून ठेवा मुलीचं नाव

विठ्ठल – तुलसी : ‘तुलसी’ हे हिंदूतील अतिशय गोड नाव. तुळस हे भारतीय संस्कृतीमधील महत्वाचं रोपं. गुणकारी, औषधी अशा या झाडाच्या नावाने तुम्ही मुलीचं नाव ठेवू शकता. तसेच विठ्ठलाच्या गळ्यात कायमच तुळशीची माळ घालतात.

विठ्ठल – वृंदा : दोन अक्षरी असं हे ‘वृंदा’ नाव. दारासमोर तुळशीचं वृदांवन असतं. ‘वृंदा’ नावाची लेक पण अशीच आपल्या घराची शोभा वाढवत असते. हिंदू धर्मात या नावाला खूप महत्व आहे. या नावासाठी शुभांक आहे ८. तर काळ्या आणि गोल्डन हा रंग या नावासाठी शुभांक आहे.

विठ्ठल – रमा : रमा हे देव रामावरून तयार झालेलं नाव आहे. राम, विठ्ठल ही परमेश्वराची एकच रुपं. विठ्ठल नाव असलेल्या वडिलांच्या मुलीसाठी ‘रमा’ हे नाव अतिशय सुंदर आहे. रमाकरता ६ हा शुभांक आहे तर निळा रंग हा अतिशय खास आहे.

(वाचा – Twins Surprising Facts : तुम्हाला देखील जुळी व्हावीत असं वाटतं? तर मग जुळ्या प्रेग्नेसीबद्दल जाणून घ्या ‘या’ सरप्राईजिंग गोष्टी)

बाबासाठी लेक कायमच असते ‘गोड परी’

वैभव – वैभवी : वैभव आणि वैभवी या दोन्हीचा अर्थ आहे श्रीमंत. अतिशय हुशार असलेली ही मुलगी कायमच आपल्या बाबाचं नाव सातासमुद्रापार नेईल. ‘वैभवी’ या नावासाठी शुभांक आहे २. तर हिरवा आणि क्रिम हे दोन रंग अतिशय शुभ आहेत.

योगेश – योगेश्वरी : ‘योगेश्वरी’ हे देवी दुर्गाचं नाव आहे. योगेश्वरी या नावाकरता ४ हा शुभांक आहे. तसेच यासाठी निळा हा रंग अतिशय शुभ आहे.

योगेश – यक्षिता : ‘यक्षिता’ नावाचा अर्थ आहे सुंदर मुलगी. या नावाच्या मुलींसाठी ४ हा शुभांक आहे तर मराठी हे या नावाच्या मुलींसाठी असलेल्या शुभ रंगांपैकी एक आहे.

(वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या ‘मॉर्निंग रूटीनचे’ फॅन आहेत भारतीय पालक, सक्सेस मंत्रामुळे मुलं होणार कायम यशस्वीच..!))

लेकीसाठी बाबा कायमच असतो ‘सुपर हिरो’

दक्ष – दक्षता : दक्षता हे नाव आपण अनेकदा ऐकतो. पण या नावाचा अर्थ काळजी. ‘दक्षता’ नावाच्या मुली वडिलांची अतिशय चांगली काळजी घेतात. २ हा या मुलींचा शुभांक आहे. तर हिरवा आणि क्रिम यांचा शुभ रंग आहे.

दक्ष – दक्षिणा : दक्षिणा हे देखील अतिशय युनिक नाव आहे. ‘दक्षिणा’ म्हणजे देवाची भेट. या मुलींसाठी ४ हा शुभांक आहे तर निळा आणि ग्रे हा रंग अतिशय शुभ आहे.

दर्शन – दर्शना : दर्शना म्हणजे नजरेसमोरचं… एक नजर. या नावाच्या मुली अतिशय गोड असतात. या नावाच्या मुलींकरता ७ हा शुभांक आहे तर सफेद हा रंग अतिशय खास आहे.

(वाचा – When baby recognize fathers : कितव्या आठवड्यात तुमचं बाळ तुम्हाला ओळखायला लागतं, एक्सपर्टकडून जाणून घ्या प्रोसेस))

मुलगी आणि बाबा शेअर करतात खास बाँड

अजित – अजिता : हे नाव अतिशय सामान्य वाटत असलं तरी ही तुम्ही या नावाचा विचार करू शकता. तुमच्या लेकीचा कायमच विजय व्हावा असं वाटत असेल तर या नावाचा नक्की विचार करा. ‘विजयी ‘असं या नावाचा अर्थ आहे. या नावाचा शुभांक ५ आहे तर व्हाईट, ग्रे असं या नावाचा शुभ रंग आहे.

अभय – आभा : ‘आभा’ या नावाचा अर्थ आहे शाइन. कायमच चमकणारी. ही मुलगी कायमच आपल्या वडिलांचं नाव चमकवणारी असते. या मुलींकरता शुभांक ३ आहे तर पर्पल हा शुभ रंग आहे.

अभय – अभिज्ञा : ‘अभिज्ञा’ हे देवाचं नाव आहे. देवी पार्वतीचं नाव म्हणजे अभिज्ञा. अभिज्ञासाठी शुभांक १ आहे तर पिवळा, भगवा आणि गोल्डन हा शुभ रंग आहे.

(वाचा – Nipple Discharge Without Pregnant : गर्भवती नसतानाही निप्पलमध्ये स्त्राव येतोय? हे वंधत्वाचं तर लक्षण नाही ना, जाणून घ्या))Source link

Leave a Reply

Your email address will not be published.