बदलापूर प्रकरणातील आरोपी ठार:पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला, प्रत्युत्तरात पोलिसांनीही केला गोळीबार
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधीच्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असतांना अक्षयने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आहे. या घटनेत अक्षय शिंदे यालाही गोळी लागली आहे. आरोपीने तीन राऊंड फायर केल्याची माहिती होती. आरोपीने कशी हिसकावली बंदूक? आज बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता शिंदे याने एका हवालदाराकडून शस्त्र हिसकावले आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रकरणात आरोपी असल्याने निर्णय घेतला असावा- शिरसाट यावर संजय शिरसाट म्हणाले की, विकृत असलेल्या माणसाला पोलिसांनीही सांभाळून ही परिस्थिती हाताळायला हवे होते. पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्याच्याकडे जे व्हिडिओ मिळाले आहेत. तो केवळ एका प्रकरणातील आरोपी नसून त्याच्याकडे अनेक प्रकरणांत अडकणार असल्याची भिती होती. त्यामुळे जगण्यापेक्षा आपण जीवन संपवायचे असे त्याला वाटले असल्याचेही शिरसाठ म्हणालेत. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी- अंधारे सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही घटना धक्कादायक आहे. एका आरोपीने स्वतःवर गोळी झाडली ही इतकी सामान्य घटना नाही. हैदराबादमध्ये चार आरोपींवर गोळीबार करून त्यांचे एन्काउंटर करण्यात आले. तसेच या प्रकरणात नेमके काय झाले? याची सीबीआय चौकशी करायला हवी. आरोपीविरोधात भक्कम पुरावे होते- उज्ज्वल निकम कुणीही कुठल्या प्रकारचे या घटनेचे राजकारण करता कामा नये. या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल. परंतु याचे राजकारण करून त्यातून वेगळा अर्थ काढण्यात आता काहीही अर्थ नाही. परंतु आरोपीविरोधात भक्कम पुरावे होते आणि त्याला दोन बालिकांनी ओळखले होते. त्यामुळेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असून त्याने स्वतःवर गोळीबार केला असल्याची शक्यता अँडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी वर्तवला आहे. अक्षय 1 ऑगस्टला शाळेत रुजू झाला, 12-13 ऑगस्टला लैंगिक अत्याचार
लैंगिक शोषणाची घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली होती. आदर्श शाळेतील 23 वर्षीय सफाई कामगार अक्षय शिंदे याने दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण केले. यानंतर दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरू लागल्या. पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका पालकाने त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केली असता खरी घटना समोर आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी POCSO प्रकरण असूनही FIR नोंदवण्यास विलंब केला. नंतर त्यांना निलंबित करण्यात आले. मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 17 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षयची 1 ऑगस्ट रोजी शाळेतच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. मुली आरोपीला दादा म्हणत
पोलिस चौकशीत समोर आले की, मुलगी त्याला दादा म्हणायची. मुलीच्या म्हणण्यानुसार, त्याने तिचे कपडे काढून तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेत महिला कर्मचारी नव्हती. चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे कोण? बदलापूर; आरोपीने 3 लग्न केले, तिन्ही बायकांनी सोडले:तिसऱ्या पत्नीची महिन्याभरातच सोडचिठ्ठी, मोबाइलमध्ये आढळले अश्लील व्हिडिओ ‘त्याला चौकाचौकात फाशी द्यावी. शिक्षा अशी असावी की त्याच्यासारख्या लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल. आमच्या गावाचे नाव खराब केले. आता त्याच्या कुटुंबीयांनाही येथे राहू दिले जाणार नाही. त्याने केलेल्या कृत्याची संपूर्ण गावालाच लाज वाटते. बदलापूरच्या खरवई गावातील लोक संतप्त झाले आहेत. हे गाव महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आहे. हे प्रकरण शाळेतील दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे असून आरोपी अक्षय शिंदे हा याच गावचा रहिवासी आहे. हा सर्व प्रकार 13 ऑगस्ट रोजी घडला. अक्षय आणि त्याचे कुटुंबीय शाळेत साफसफाईचे काम करायचे. वाचा संपूर्ण बातमी… बलात्कार हत्या प्रकरणाची टाइमलाइन…