बेलग्रेड: भारताचा धाकड कुस्तीपटू बजरंग पुनिया याने जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकत पुन्हा आपली उत्कृष्ट खेळीची झलक जगाला दाखवून दिली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळवून दिले आहे.

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. यापूर्वी बजरंगने २०१३ मध्ये कांस्य, २०१८ मध्ये रौप्य आणि २०१९ मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले होते. जागतिक कुस्ती स्पर्धेच्या या मोसमात बजरंगने ६५ किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा ११-९ असा पराभव केला. बजरंग व्यतिरिक्त महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

पहिल्या नजरेतलं प्रेम आणि ९ वर्षांनंतर लग्न, रॉजर फेडररसारखी लव्हस्टोरी साऱ्यांनाच हवी

बजरंगला रिपेचेजमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात बजरंगला पराभव पत्करावा लागला होता, पण त्याला रेपेचेजमध्ये कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली. रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात त्याने आर्मेनियन कुस्तीपटू व्हेजगेन टेवान्यानचा पराभव केला. याआधी बजरंगला सलामीच्याच सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, पण तरीही त्याने स्पर्धेत राहण्याचा निर्णय घेतला.

दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम झाला. जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप ब्राँझ मेडल प्लेऑफ सामन्यात बजरंग ६-० ने पिछाडीवर होता, पण नंतर सामन्यात परतत ११-९ अशा गुण फरकाने सामन्यात विजय मिळवला.
बजरंग व्यतिरिक्त भारतातील अनेक महिला आणि पुरुष कुस्तीपटू जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताने या चॅम्पियनशिपसाठी ग्रीको-रोमन, फ्रीस्टाइल आणि महिला कुस्तीच्या ३० प्रकारांमध्ये एकूण ३० कुस्तीपटू पाठवले होते, त्यापैकी आतापर्यंत फक्त दोनच पदके जिंकली आहेत.

भारतावर विशेष प्रेम, गोमातेचा भक्त! टेनिसचा बादशाह रॉजर फेडररकडे आहे ‘गंगा’

बजरंग आणि विनेश फोगट व्यतिरिक्त, सागर जगलान (७४ किलो), नवीन मलिक (७० किलो) आणि निशा दहिया (६८ किलो) यांचा कांस्यपदकासाठी सामना झाला होता, परंतु त्यांना यश मिळवता आले नाही. याशिवाय ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रवी दहिया याला स्पर्धेच्या सुरुवातीलाच धक्का बसला. त्याला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.