अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात रुग्णालयात असताना विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गाजत होती. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवरून महसूल मंत्री आणि थोरात यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर एकही टिकेची संधी सोडली नाही. आता बरे होऊन पुन्हा मैदानात आलेल्या थोरांतांनी त्याची परतफेड करण्यास सुरवात केल्याचे दिसून येते. आज संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत थोरात यांनी पालकमंत्री विखे यांच्यावर अनेक आरोप करून सज्जड इशाराही दिला आहे. अचानक मिळालेल्या मंत्रिपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. आपल्या राजकीय सुडापोटी जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, धमक्या आणि दादागिरी संगमनेर मध्ये चालणार नाही, असे थोरातांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेसने नगर ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा आज संगमनेरमध्ये सत्कार करण्यात आला. त्यानंतर थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी थोरात म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक आमदाराला काही अधिकार दिलेले आहेत. नगर जिल्ह्यात विद्यमान पालक मंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जाते आहे. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. आपल्या चेल्याचपाट्यांना हाताशी धरून अधिकारी आणि कंत्राटदारांना धमकावले जात आहे. कामे बंद पाडली जात आहे. चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारी बैठकांमध्ये, सार्वजनिक रित्या अपमानित करून धमकावले जात आहे. हे प्रकार अशोभनीय आहेत.’
सावरकर समझा क्या…; राहुल गांधींच्या फोटोसह काँग्रेसचा ट्विटद्वारे टोला, रिजिजू म्हणाले…
‘ज्यांना स्वतःच्या तालुक्यातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, ते संगमनेरला येऊन बैठका घेतात आणि कामे बंद पाडतात हे हास्यास्पद आहे. जबाबदार मंत्री आणि नगर जिल्ह्यासारख्या सुजाण जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळणाऱ्या व्यक्तीने निदान बैठका घेताना आपल्या पदाचा तरी आब राखावा’, असेही थोरात म्हणाले.
थोरात पुढे म्हणाले, मी १९८५ पासून सक्रिय राजकारणात आहे. आजवर अनेक पालकमंत्री पाहिले. मात्र पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामाची भूमिपूजन किंवा उद्घाटन करायचे नाही, असा अजब फतवा काढणारे हे राज्यातले पहिलेच पालकमंत्री असावेत. शिवाय पूर्वी मंजूर झालेल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा स्वतःचे फोटो लावा असे सांगणारा पालकमंत्री ही मी पहिल्यांदाच पहातो आहे. एकीकडे कामे बंद करायचे आणि दुसरीकडे गावोगावी बोर्ड लावून प्रचार करायचा. हे पालकमंत्र्यांचे धोरण आहे की सरकारचे, असा सवालहीथोरात यांनी केला.
अदानींचे स्वप्न भंगले, हिंडेनबर्गने गौतम अदानींना दिला मोठा धक्का, ३४,९०० कोटींचा प्रकल्प थांबवावा लागला
थोरात पुढे म्हणाले, आमदार हा समन्वय समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो शिवाय अधिकारी आणि आमदार यांच्या चर्चेतून तालुक्याच्या विकासासाठी अभिप्रेत असणाऱ्या कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी ठरविली जाते. त्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेलाच सुरुंग लावण्याचे काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी पाच वर्षांचा एक दृष्टिकोन समोर ठेवलेला असतो त्या व्हिजनलाच मंत्री सुरुंग लावत आहेत असे दिसते. नगर जिल्ह्याच्या विकास कामांना गालबोट लावणाऱ्या पालकमंत्र्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे, असेही थोरात म्हणाले.
दत्तक घेणारी ती आई की जल्लाद?, इस्त्रीने जाळले, हात तोडले, ७ वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगात लाकूड घुसडले